नगर रस्त्यावर दुहेरी उड्डाणपूल नको

स्थानिक नागरिक न्यायालयात जाण्याच्या तयारीत

पुणे – नगर रस्त्यावर “बीआरटी’, मेट्रो प्रकल्प असल्याने वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सुमारे 175 कोटी रुपयांचा खर्च करून दुमजली उड्डाणपूल उभारला जाणार आहे. मात्र, हा खर्च अनाठायी ठरणारा आहे. प्रशासनाने हा पूल उभारण्याचा प्रयत्न केल्यास नागरिकांनी कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिला आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी यापूर्वी निश्‍चित केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी पथारी व्यावसायिकांचे अतिक्रमण आणि अनियमित पार्किंगवर कारवाई केल्यास दुहेरी उड्डाणपुलाची गरजच उरणार नाही. त्यामुळे हा पूल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात आक्रमक होण्याचे संकेत वडगाव शेरी नागरिक मंचने दिले आहेत.

नगर रस्त्यावर मेट्रोचे काम करतानाच दुहेरी उड्डाणपूल करण्याबाबत महामेट्रोने महापालिकेला पत्र पाठवून शिफारस केली आहे. मात्र, हा फक्‍त खर्च करण्याचा घाट असून स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तो रेटला जात आहे. या उड्डाणपुलाला जाहीर विरोध करून पालिका आयुक्तांनी त्याला मान्यता देऊ नये, अशी मागणी वडगाव शेरी नागरिक मंचाचे आशिष माने यांनी केली आहे. महापालिका आयुक्तांसह वाहतूक पोलीस उपायुक्त, अतिक्रमण विभाग उपायुक्त आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) माने यांनी पत्र पाठविले आहे. नागरिकांचा विरोध डावलून दुहेरी उड्डाणपुलाला मान्यता दिल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने येरवडा ते खराडीदरम्यानच्या 6 कि.मी.च्या मार्गावरील पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे अतिक्रमण विभागाने ठरविले होते. तर अस्ताव्यस्त पार्किंग केल्या जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन वाहतूक पोलिसांनी दिले होते. पण, या दोन्ही गोष्टींकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानेच कोंडी निर्माण होत असल्याचा दावा माने यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)