नगर रस्त्यावरील सुधारीत मेट्रो मार्ग निश्‍चित

महापालिकेची तत्त्वत: मान्यता : नवीन मार्गाने प्रकल्प खर्च वाढणार

पुणे – पुणे मेट्रोचे नगर रस्त्यावरील सुधारीत मार्ग अखेर निश्‍चित झाले आहेत. या सुधारीत मार्गाच्या फेर रचनेत महापालिका आयुक्ता सौरभ राव यांनी नुकतीच तत्त्वता: मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हा नवीन मार्ग येरवड्यापासून नगर रस्त्याऐवजी मेट्रोचा मार्ग कल्याणीनगरच्या मागील बाजूने शिवणे-खराडी या प्रस्तावित नदीपात्रातील रस्त्याने पुढे गोल्ड अॅडलॅब्स सिनेमागृहासमोरून रामवाडीच्या दिशेने जाणार आहे.

-Ads-

महामेट्रोचा वनाज ते रामवाडी हा मार्ग येरवड्यापासून पुढे गुंजन चौक, शास्त्रीनगर ते रामवाडी असा जाणार होता. मात्र, या मार्गात असलेले आगाखान पॅलेस हे राष्ट्रीय संरक्षित स्मारक असल्याने राष्ट्रीय संरक्षित स्मारक प्राधिकरणाने त्याच्या समोरील मेट्रो मार्गिकेच्या बांधकामास परवानगी नाकारली होती, त्यामुळे महामेट्रोसमोर पेच निर्माण झाला होता. या मार्गाऐवजी इतर पर्यायी मार्गांची चाचपणी महामेट्रोने केली होती. महापालिकेतर्फे विकसित केल्या जाणाऱ्या शिवणे-खराडी रस्त्यावरून कल्याणीनगरच्या मागील बाजूने गोल्ड अॅडलॅब्सवरून नगर रस्त्यापर्यंतचा मार्ग विविध दृष्टीने सर्वांत सोयीचा असल्याचे लक्षात आल्याने शिवाजीनगर ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेत बदल केला जाणार आहे. या नव्या मार्गामुळे मेट्रोचा मार्ग 0.92 किलोमीटरने वाढणार असून, त्याच्या खर्चातही वाढ होणार आहे. तसेच कल्याणीनगर येथील स्थानकही बदलणार आहे.

नव्या मार्गामुळे नगर रस्त्यावरील कल्याणीनगर स्टेशनची जागा बदलावी लागणार आहे. या नव्या मार्गाबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या सहमतीने या मार्गावरील काम प्राधान्याने सुरू करण्याच्या सूचना महामेट्रोला देण्यात आल्या आहेत. या कामासाठी त्यांना महापालिकेची तत्त्वत: मान्यता आवश्‍यक होती. तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ती देण्यात आली आहे.

– सौरभ राव, महापालिका आयुक्त


या बदललेल्या मार्गावर आम्ही सर्वांचे मत घेत आहोत. त्यानुसार, महापालिकेने आम्हाला तत्त्व: मान्यता दिलेली आहे. मात्र, त्यांच्या लेखी पत्राची वाट पाहात असून पत्र मिळताच पुढील काम सुरू केले जाईल. या वाढीव मार्गामुळे 1 किलोमीटरचे अंतर वाढणार असले तरी, खर्चात फारसा फरक पडत नाही.

– ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)