नगर मार्गावरील पार्किंग प्रस्तावाचा पाठपुरावा करणार

शिक्रापूर- महामार्ग वाहतूक पोलिसांकडून पाच पोलिसांची नियुक्ती, पाबळ चौकातील एसटी बसथांब्याचे 100 मीटर पुढे स्थलांतर, कंटेनर आणि अवजड वाहनांची वाहतूक रात्रीची करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अध्यादेश यांसह अशा अनेक पर्यायांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय गुरूवारच्या बैठकीत आमदार बाबूराव पाचर्णे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी घेतला. माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे-नगर रोडवर पार्किंगसाठीचे प्रस्ताव मंजूर करुन घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पुढाकाराने गुरूवारी (दि.17) विशेष बैठक शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली. यावेळी सुरूवातीला आमदार पाचर्णे यांनी सांगितले की, पुणे-नगर रस्ता हा भारतमाला योजने अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूर केल्याने हा रस्ता पुढील पाच वर्षात आठपदरी होईल. मात्र, तोपर्यंत वाहतूककोंडीचा प्रश्न आता सर्वस्तरांवर सोडविण्यासाठी बैठक घेतली. बैठकीनंतर पुढील आठवड्यात आपण केलेल्या उपायांची आणि झालेल्या बदलांबाबतची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे पुण्यात घेऊ असे सांगितले.
याप्रसंगी यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी, सरपंच जयश्री भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड आणि गणेश मोरे, राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपअधीक्षक एस.व्ही.जाधव, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सर्जेराव पाटील, अमर वाघमोडे, नायब तहसीलदार अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता एच. आर. चौगुले, उपअभियंता पी.बी.जाधव, पी.डी.मुरकुटे. शिरुर एसटी आगारप्रमुख गोविंद जाधव, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, श्रीकांत सातपुते, सुरेश थोरात, राभाऊ मांढरे, पंढरीनाथ गायकवाड, गुलाबराव धुमाळ, रघुनदंन गवारे, विशाल खरपुडे, रोहित खैरे आदी उपस्थित होते.दरम्यान, बैठकीप्रारंभी माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी चाकण चौकातील एसटी थांबा पुढे ढकलण्याबरोबरच आम्ही स्थानिक कार्यकर्ते घेऊन या प्रश्नी रस्त्यावर मदतीसाठी दररोज उपस्थित राहू. याशिवाय कंटेनरसाठी दिवसाच्या पार्कींगसाठी जागाही उपलब्ध करुन देऊ.

  • वाळू वाहतूक रात्रीचीच होईल
    शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी सांगितले, पार्कींगबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यास कारवाया वाढवून शिस्त लावणे शक्‍य होईल. रांजणगावचे पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी सांगितले की, औद्योगिक वसाहतीतील कामाच्या वेळा टप्प्याटप्प्याने बदलण्यासह कंटेनर आणि वाळू वाहतूक ही रात्रीचीच होईल, असे नियोजन व्हायला हवे. याचवेळी महामार्ग पोलिसांचे वतीने 5 पोलिसांचे पथक येथील पाबळ चौकात नियमित वाहतूक नियंत्रणासाठी देण्याची ग्वाही राष्ट्रीय महामार्ग पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. जाधव यांनी दिली.
  • एकत्रित समन्वय यंत्रणा राबविणार
    दरम्यान, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी सांगितले की, वरील सर्व निर्णयाची अंमलबजावणी व एकत्रित समन्वय यंत्रणा म्हणून शिक्रापूर पोलीस राहतील. यावेळी राजाभाऊ मांढरे, पंढरीनाथ गायकवाड, उत्तम गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी चर्चेत सहभाग घेतला. शिरुर एसटी आगारप्रमुख गोविंद जाधव यांनी चाकण चौकातील एसटी थांबा 100 मीटर पुढे घेत असल्याचे सांगून पाच कर्मचारी काही दिवस याच चौकात तैनात करणार असल्याचे सांगितले. यावेळी बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी सर्वांचे आभार मानले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)