नगर महापालिका रणसंग्राम २०१८: राष्ट्रवादीत रंगले कुरघोडीचे राजकारण

इच्छुकांनी घाईगडबड : आघाडीच्या गुऱ्हाळामुळे इच्छुकांचा संयम तुटला 

नगर: राष्ट्रवादीतर्फे इच्छुकांच्या मुलाखती झाली. त्याचा रिझर्ल्ट येणे अजून बाकी आहे. हा रिझर्ल्ट जाहीर झालेला नसतानाही राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांनी आणि इच्छुक असलेल्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. इतर पक्षाच्या नगरसेवकांनी तिकिट निश्‍चितीअगोदरच रथच सजविला आहे. तिकिट आपल्याच, असा दावा त्यामागचा आहे. यामुळे राष्ट्रवादीत कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. या कुरघोड्यांमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची बोलणी सुरू आहे. जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरू आहे. राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप तर कॉंग्रेसकडून डॉ. सुजय विखे पाटील हे आघाडीची अंतिम चर्चा करत आहेत. डॉ. विखे पाटील यांचे महापालिकेच्या निवडणुकीसाठी वेगळीच रणनीती आखत आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली आहे. आमदार जगताप दुही हे देखील राष्ट्रवादीची रणनीतीचे काही पत्ते राखून ठेवले आहेत. असे असताना राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्यांनी आणि विद्यमान काही नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ज भरलेल्यांनी फॉर्म भरण्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे अगोदर फॉर्म भरून ठेवला आहे, असे दावा करत आहेत.

कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, मीना शिवाजी चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी अर्ज भरले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी 175 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये आजी-माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. मंगळवारपासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱयांमध्ये प्रामुख्याने महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सारिका भूतकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेविका सुनिता भिंगारदिवे, दिपाली बारस्कर, माजी सभागृहनेते अशोक बडे, कुमार वाकळे, नगरसेवक दीप चव्हाण, संपत बारस्कर, मजी नगरसेविका रोहिणी शेंडगे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. रविवारी शासकीय सुटी असल्याने त्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

डॉ. विखे पाटील कटू निर्णय घेण्याच्या तयारीत… 

डॉ. सुजय विखे पाटील हे लोकसभेची तयारी करत आहेत. महापालिका निवडणूक ही त्यांच्यासाठी रंगीत तालीम आहे. नगर शहरातील कॉंग्रेसमधील गटातटाचे राजकारण सर्वश्रूत आहे. या राजकारणाची झळ पूर्वी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना पोहचलेली आहे. डॉ. विखे पाटील हे देखील त्यातून सुटलेले नाही. जनसंघर्ष याचे नियोजन त्यामुळे शहराऐवजी ग्रामीण भागात करण्याची वेळ डॉ. विखे पाटील यांच्यावर आली. माघचा हा धडा लक्षात घेऊन डॉ. विखे पाटील यांनी महापालिकेची निवडणुकीच सर्व सूत्रे हाती घेतलेली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्याशी या निवडणुकीसंदर्भात बारकाईने चर्चा सुरू आहे. त्यात कोणत्याही उणिवा ते ठेवत नाहीत. डॉ. विखे पाटील आणि आमदार जगताप हे दोन्ही बाजूने याबाबत मौन बाळगून आहेत. त्यामुळे आघाडीबाबत कोणता निर्णय होतो, हे दोन्ही बाजूच्या स्थानिक नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना माहित नाही. डॉ. विखे पाटील कॉंग्रेससाठी योग्य, पण कटू निर्णय घेण्याची तयारी घेतल्याचे समजते. हा निर्णय उद्यापर्यंत (शनिवार) जाहीर होण्याची शक्‍यता आहे.

आघाडीचा 41-27 चा फॉर्म्युला! 

राष्ट्रवादी कॉंग्रेस शहरात नेहमीच अव्वलचा पक्ष राहिलेला आहे. असे असताना स्थानिक कॉंग्रेस नेत्यांची अवाजवी मागणी पूर्ण तयार करण्यास राष्ट्रवादी तयार नाही. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी आघाडीची चर्चा करताना आमदार संग्राम जगताप यांनी त्यावरच भर दिला आहे. जिथे ताकद आहे, तिथेच दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी उभे राहून ते निवडून आणावेत, यावर अधिक भर दिल्यास सत्ता घेण्यास फायदा होईल, असे आमदार जगताप यांची भूमिका आहे. डॉ. विखे पाटील यांनीही या भूमिकेचे समर्थन केल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीला 41 जागा सोडून कॉंग्रेस 27 जागा लढविण्याच्या तयारीत आहेत. या 27 जागांपैकी 22 उमेदवारांची नावे देखील डॉ. विखे पाटील यांनी निश्‍चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)