नगर महापालिका रणसंग्राम: निष्ठावंतांना डावलून भाजपची 33 ची यादी जाहीर 

बंडखोरी होण्याची शक्‍यता; पालकमंत्र्यांची स्वाक्षरीच नाही 

नगर: निवडणुकीत सर्वच आघाड्यावर तयारीत असलेल्या भाजपची उमेदवारी यादी जाहीर करण्यास विलंब होत आहे. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर तब्बल चार दिवसांनी सोमवारी दुसरी 33 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर करतांना स्थानिक नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागली. एवढे करूनही या यादीत निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने पक्षाची डोकेदुखी आता आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. या यादीत नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातील जुने व निष्ठवंतांना बाजूला करण्यात आल्याने निवडणुकीत बंडखोरीची शक्‍यता वाढली आहे.

या यादीत रिपाईंच्या गटाचा विचार करण्यात आल्या असून काही जागा त्यांना देण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत विद्यमान नगरसेवकांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीत माजी नगरसेवकांची पत्नी, बहिण, यासह नव्याने पक्षात आलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोअर कमिटीमधील पालकमंत्री प्रा. राम शिंदे वगळता उर्वरित सहा सदस्यांच्या स्वाक्षऱ्या या दुसऱ्या यादीवर आहे. प्रभागनिहाय जाहीर झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.

प्रभाग क्र. 1 विद्या दगडे, संदिप कुलकर्णी, प्रभाग क्र. 2 शीतल गुडा प्रभाग क्र.3 सय्यद बाबामियॉं, सय्यद अब्दुल्ला शाकीर, प्रभाग क्र. 4 वंदना शेलार, स्वप्निल शिंदे, प्रभाग क्र. 6 आरती बुगे, वंदना ताठे, रवींद्र बारस्कर, प्रभाग क्र. 7 मोहन कातारे, कमल कोलते, प्रभाग क्र. 8 सुवर्णा बोरूडे, महेश सब्बन, प्रभाग क्र. 9 अनुराधा साळवे, अंजली वल्लाकट्टी- देवकर, प्रदिप परदेशी, प्रभाग क्र. 10 शेख इशरत जहागीरदार, सुनील भिंगारे, नरेश चव्हाण, प्रभाग क्र.11 गयाज कुरेशी, प्रभाग क्र. 12 सुरशे खरपुडे, निर्मला गिरवले, प्रभाग क्र. गायत्री कुलकर्णी, सोनाली चितळे, मयुर बोचुघोळ, प्रभाग क्र. 14 ऍड. राहुल रासकर, संगिता गांधी, सुनील ठोकळ, प्रभाग क्र. 15 गीताजंली काळे, दत्ता गाडळकर, सुरेखा खैरे, चंद्रकांत पाटोळे.

राष्ट्रवादीला बसला धक्का 

राष्ट्रवादीचे कै. माजी नगरसेवक कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला गिरवले यांना भाजपने प्रभाग क्र.12 मधून उमेदवारी दिली आहे. अर्थात गिरवले या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. परंतू त्यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपची उमेदवारी स्वीकारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला जोरदार धक्‍का बसला आहे. विशेष म्हणजे निर्मला गिरवले यांची लढत शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांच्याबरोबर होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे शहराचे लक्ष लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)