नगर महापालिका रणसंग्राम: कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर आज होणार शिक्कामोर्तब

नगर: महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे गुऱ्हाळ शनिवारी दिवसभर सुरू होते. यावर उद्या रविवारी पडदा पडेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आमदार संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी आघाडी आणि जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेतला असून, तो उद्या रविवारी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. महापालिका निवडणुकीस कॉंग्रेस-राष्ट्रवादीची पहिल्यापासून आघाडी राहिली आहे. यावेळी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक राजकीय गणिते बदलली आहेत. त्याचा परिणाम कॉंग्रेसवर चांगलाच झाला आहे. आघाडीच्या गुऱ्हाळात कॉंग्रेसने अतिरीक्त जागा मागितल्या होत्या. त्यावर राष्ट्रवादीचा सहमती नव्हती.

प्रदेशपातळीवर याबाबत तक्रारी झाल्या. प्रदेशपातळीवरून दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आघाडीची जबाबदारी डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर सोपावली आहे. आमदार जगताप आणि डॉ. विखे पाटील उद्या रविवारी आघाडीच्या निर्णयाची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आघाडीच्या निर्णयाची उत्सुकता लागली आहे. आघाडी होण्यापूर्वीच दोन्ही बाजूच्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचाही परिणाम आघाडीवर झाला आहे. हा निर्णय जाहीर करताना दोन्ही बाजूने सावधानता बाळगली जात आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)