नगर महापालिका रणसंग्राम: शिवसेना-भाजपमध्ये कडवी झुंज

राष्ट्रवादी गेले बॅकफुटवर; माजी पदाधिकारी आमनेसामने

प्रतिष्ठेची लढत प्रभाग 15

नगर: आगरकरमळ्यासह रेल्वे स्थानक, कायनेटिक चौकापर्यंत व्यापलेल्या प्रभाग 15 मध्ये शिवसेना व भाजप यांच्यात कडवी झुंज होत आहे. राष्ट्रवादीतर्फे विद्यमान दोन नगरसेवक रिंगणात असले तरी प्रभाव मात्र शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना दिसत असल्याने राष्ट्रवादी बॅंकफुटवर गेली आहे. या दोन्ही पक्षांचे उमेदवार तगडे असल्याने यात कोण बाजी मारणार याबाबत प्रभागासह नगरमध्ये जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रभागात विद्यमान पाच नगरसेवक निवडणूक रिंगणात उभे आहेत.

या प्रभाग 15 ब मध्ये माजी उपमहापौर गीतांजली काळे व स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा जाधव यांच्यात चुरशी लढत आहे. या हे दोन्ही माजी पदाधिकारी एकाच भागात राहत आहेत. शिवसेनेचे उमेदवार निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच दीड महिने अगोदर निश्‍चित झाल्याने या चारही उमेदवारांनी या प्रभाग चांगलीच पिंजून काढला आहे. राष्ट्रवादीचे तीन उमेदवार निश्‍चित होते. परंतू एक उमेदवार ऐनवेळी जाहीर करावा लागला. त्यामुळे प्रचारात राष्ट्रवादीला अडचणी आल्या आहेत. त्यात मातब्बर उमेदवार शिवसेना व भाजपकडे असल्याने कार्यकर्त्यांची मोठी फळी या दोन्ही पक्षांनी उभे केली आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादीला करता आली नाही. रेल्वे स्थानक परिसरावर राष्ट्रवादीचे विजय गव्हाळे व आशा पवार याचे वर्चस्व आहे. तर आगरकर मळा ते टिळक रस्ता या परिसरात भाजप व शिवसेनेचा प्रभाव आहे. परंतू आता हा सर्वच परिसर या प्रभागात असल्याने राष्ट्रवादीला केवळ एका भागावर अवलंबून न राहता अन्य परिसरात जावे लागणार आहे.

प्रभाग 15 ड मध्ये माजी सभागृहनेते अनिल शिंदे याची लढत भाजपचे दत्तात्रय गाडळकर व राष्ट्रवादीचे दत्तात्रय खैरे यांच्यात होत आहे. शिंदे यांनी आतपर्यंत या भागात तीनवेळा नेतृत्व केले आहे. त्याच्या पत्नी शीला शिंदे या महापौर राहिल्या आहेत. त्यामुळे शिंदे यांनी या भागात विकास कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. दत्तात्रय गाडळकर हे तसेच नवखे उमेदवार आहेत. तर दत्तात्रय खैरे यांनी आतापर्यंत दोन वेळा लढत दिली पण त्यांना यश आले नाही. प्रभाग 15 क मध्ये मनसेचे रेवती भुतारे, शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका विद्या खैरे व राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आशा पवार यांच्यात सामना होत आहे.

भाजपच्या सुरेखा खैरे या देखील स्पर्धेत आहेत. या प्रभागात भाजपने गीताजंली काळे वगळता अन्य सर्वच उमेदवार आयात केले आहेत. त्यातील बहुतांशी उमेदवार हे राष्ट्रवादी व शिवसेनेचे आहे. त्याचा फायदा भाजपला होणार का असा प्रश्‍न आहेत. हा प्रभाग शिवसेना व भाजपने प्रतिष्ठेचा केला असून त्या दृष्टीने दोन्ही पक्षांकडून नियोजन करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टीचा भाग येतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)