नगर महापालिका रणसंग्राम: विरोधानंतरही मतमोजणीचे ठिकाण “फिक्‍स’ 

नगर: स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून महापालिका निवडणूक मतमोजणीचे ठिकाण सार्वजनिक सुरक्षितेच्या कारणावरून योग्य नसल्याला हवाला देऊनही राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक निरीक्षकांनी तेच ठिकाण “फिक्‍स’ केल्याची माहिती समोर येत आहे. सारसनगरच्या भावनीनगर येथील राज्य सरकारच्या वखार महामंडळाचे गोदामात नऊ डिसेंबरला महापालिकेची निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक निरीक्षकांनी ठिकाणाबाबत हिरवा कंदील देताच जिल्हा प्रशासनाने कार्यवाहीला सुरूवात केली आहे.

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून जागेची पाहणी सुरू होती. त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाण पाहिले. शहराजवळची ठिकाणे पाहण्यात आली. काही ठिकाणे सार्वजनिक सुरक्षितेचा मुद्यावरून टाळण्यात आली. मतमोजणीचे ठिकाण फिक्‍स होत नसतानाच राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक निरीक्षक राजीव मित्तल हे नगरला आले. त्यांनी मतमोजणीच्या ठिकाणीची माहिती विचारली. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सारसनगरमधील भवानीनगरमधील राज्य सरकारच्या वखार महामंडळाचे गोदाम दाखविले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा आणि महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जागेची पाहणी करताना मित्तल यांना हे ठिकाण सार्वजनिक ठिकाण असल्याने सुरक्षितेच्या दृष्टिने योग्य नसल्याचे सांगितले. मित्तल यांनी या सूचनेकडे योग्यरित्या दुर्लक्ष करत मतमोजणीसाठी हेच ठिकाण योग्य असल्याचा हिरवा कंदील दिला. “राजा बोले दल हाले’ त्यानुसार जिल्हा प्रशासनाने देखील त्यावर शिक्कामोर्तब करत कामाला गती दिली आहे. दरम्यान, या ठिकाणाला निवडणूक निरीक्षक म्हणून आलेले धुळे येथील अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बिडसे आणि मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनीही नापसंती व्यक्ती केल्याची माहिती मिळते आहे.

अधिकाऱ्यांची टेम्पोमधून होणार ने-आण! 

निवडणुकीच्या कामासाठी सुमारे दोन हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. साहित्याची वाहतूक करण्यासाठी टेम्पोंसारख्या वाहन अधिग्रहीत करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. विशेष म्हणजे, या साहित्याच्या वाहतुकीबरोबर टेम्पोंमधून अधिकारी व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यात येणार आहे. तसा आदेशच महापालिकेच्या उपायुक्तांना काढला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)