नगर महापालिका रणसंग्राम: छुपी… पण नियोजनबद्ध “काटाकाटी’ 

शिवसेना, भाजप, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार सुरू ; थंडीत राजकीय वातावरण तापले 

नगर – शिवसेना, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांची आघाडी या प्रबळ राजकीय पक्षांमध्येच महापालिका निवडणुकीची घमासान आता सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाने नारळ वाढवून प्रचारात आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीकडून नियोजनबद्ध पद्धतीने प्रचाराची रणनिती सुरू आहे. शिवसेनेने प्रचाराची रणनिती “गमिनी कावा’ पद्धतीने चालविली आहे. वरकरणी “ऑल इज वेल’ वाटत असले, तरी या थंडीतही राजकीय पक्षांनी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापून ठेवले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी नऊ डिसेंबरला मतदान होणार आहे. प्रत्येक पक्षाने विजयाची गणिते आखली आहेत. भारतीय जनता पक्षाला निवडणुकीअगोदरच अनेक ठिकाणी तोंड द्यावे लागले. केडगाव येथे घडवून आणलेल्या राजकीय भूकंपनानंतर खासदार दिलीप गांधी यांचे पूत्र सुवेंद्र आणि स्नुषा दीप्ती यांच्यासह चार जणांचे अर्ज छाननीत बाद झाले होते. खासदार गांधी यांनी एकट्याने ही लढाई लढली आणि ती जिंकली देखील! केडगाव येथील राजकीय भूकंप मात्र आमदार शिवाजी कर्डिले यांनी घडविताना खासदार गांधी, ज्येष्ठ नेते ऍड. अभय आगरकर आदींना बरोबर घेतले होते. खासदार गांधी यांना मात्र त्यांच्या न्यायालयीन लढाईत कोणीही मदत केली नाही. यावरून खासदार गांधी यांनी यापुढे महापालिका निवडणुकीची रणनीती शहरात एकट्यालाच आखावी लागणार असल्याची समज आली आहे. खासदार गांधी यांनी देखील त्यानुसार प्रचाराची राजकीय गणिते बदलली आहेत. या लढाईनंतर त्यांनी काही “हुकमी पत्ते’ राखून ठेवत प्रचाराची रणनीती आखली आहे. शांत आणि संयमी खेळी हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने मित्र पक्षांनाबरोबर घेऊन आघाडी उभारली आहे. डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप हे आघाडीचा रथ हाकत आहेत. विखे पाटील आणि जगताप हे दोघे बरोबर वाटत असले, तरी त्यांच्या प्रचाराच्या रणनीती वेगवेगळ्या आहेत. विखे पाटील यांची रणनीती स्वतंत्र आहे. विखे पाटील यासाठी वेगळी यंत्रणा वापरतात, हे सर्वश्रूत आहे. शहरातील कॉंग्रेसचे जुने कार्यकर्त्यांनाही विखे पाटील यांची ही यंत्रणा अवगत नाही. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे युवा वर्ग मोठा आहे. आमदार जगताप देखील यंग आहे. यंग कार्यकर्त्यांना त्यांचे आकर्षण आहे. आमदार जगताप यांचीही उठबस यंग कार्यकर्त्यांमध्येच अधिक असते. या यंग कार्यकर्त्यांशी जोडलेली नाळ हा आमदार जगताप यांचा “प्लस पॉईंट’ आहे. प्रचाराला अधिक लवचिकतेने आणि वेगाने पुढे नेण्याचे सामर्थ्य आमदार जगताप हे याच यंग कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लिलया पेलतात. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचे सारथी आणि मार्गदर्शक त्यांचेच वडील आमदार अरुण जगताप हे करत आहेत. त्यामुळे आमदार जगताप यांच्या रणनीतीला रोखण्याचे आव्हान विरोधकांसमोर असणार आहे.

शिवेसनेचे उपनेते अनिल राठोड आणि शिवसेना, हे नगरकरांसाठी वेगळे, असे समीकरण नाही. अनिल राठोड हे 25 वर्षे शहराचे आमदार राहिले आहेत. माजी मंत्री आहेत. नगरातील जुन्या-जणात्या मतदारांपर्यंत त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते नेहमीच “चेक ऍण्ड मेट’च्या भूमिकेत दिसतात. राठोड यांचे राजकारण हे “शिवसेना स्टाईलने’च राहिले आहे. हीच स्टाईल त्यांची ओळख आहे. युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनीही यंग कार्यकर्त्यांची फौज शहरासह उपनगरापर्यंत उभारली आहे. यंग कार्यकर्ते किती मतदान खेचतात, हे 10 डिसेंबरला मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल. विरोधकांना सुगावा नसणे हे शिवसेनेच्या प्रचाराचे वैशिष्ट आहे. यावेळीही शिवसेनेने विरोधकांना नारळ वाढवून दिला आहे. परंतु शेवटच्या टप्प्यात योग्य “बाण’ वापरणे, हे शिवसेनेची महत्त्वपूर्ण बाजू आहे.

राजकीय खच्चीकरणाचा खेळ रंगणार 

शिवसेना व भाजपच्या उमेदवार खेचाखेचीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला उमेदवारही मिळेणासे झाले. त्यामुळे कमी उमेदवारात महापालिकेवर आपला झेंडा फडकविण्याचे स्वप्न राष्ट्रवादीने पाहिले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी असली, तरी त्यांना उमेदवार जमवता आले नाहीत. केडगावमधील कॉंग्रेसचे आठही उमेदवार शेवटच्या दिवशी भाजपने पळवून कॉंग्रेसचे खच्चीकरण केले. सोबतच राष्ट्रवादीलाही ब्रेक दिला. या सर्व घडामोडी सध्यातरी भाजपचेही पानिपत झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)