नगर महापालिका रणसंग्राम: भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री

राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील प्रचारकांच्या सभा, रोड-शो

नगर: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला धडाक्‍यात सुरूवात करणाऱ्या भाजपने प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यातही प्रचाराचे नियोजन केले आहे. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील स्टार प्रचारकांच्या सभा आणि रोड शोजच्या माध्यमातून शहरातील वातावरण भाजपमय करण्याची रणनिती आखण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे यासारखे दिग्गज प्रचार मोहिमेत सहभागी होणार आहेत. 7 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने प्रचाराची सांगता होणार आहे. या रणनितीमुळे भाजपच्या प्रचाराला निर्णायक कलाटणी मिळणार असल्याचे मानले जात आहे.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात भाजपने दिग्गज मंत्र्यांच्या प्रचार सभांचे नियोजन केले आहे. येत्या 9 डिसेंबरला मतदान होणार असल्याने तोपर्यंत भाजपचे अनेक महत्वाचे नेते प्रचारात सहभागी होणार आहेत. परिणामी भाजपच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह संचारला आहे. त्यातच प्रचाराची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांनी होणार असल्याने ते काय बोलतात याकडे नगरकरांचे तसेच विरोधकांचेही लक्ष लागून राहिले आहे. भाजपच्या प्रचाराच्या या नियोजनामुळे शिवसेना, कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)