नगर महापालिका रणसंग्राम: निवडणुकीतून माघारीसाठी उमेदवाराला चौघांनी धमकावले

नगरसेवक नज्जू पैलवान यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल

नगर: महापालिका निवडणुकीतून अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवाराला चौघांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पराग बिल्डिंगसमोर रविवारी हा प्रकार घडला आहे. ईजाज अजीज शेख (रा. व्यारी मोहल्ला) यांनी यासंदर्भात कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विद्यमान नगरसेवकासह चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

-Ads-

नगरसेवक नजीर अहमद अब्दुल रजाक ऊर्फ नज्जू पैलवान, इब्राम बशीर शेख, इमजियाज (पूर्ण नाव माहित नाही), सय्यद इजाज खाजा (सर्व रा. झेंडीगेट, नगर) या चौघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ईजाज शेख हे महापालिका निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी रविवारी त्यांना नज्जू पैलवान यांच्यासह चौघांनी शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कोतवाली पोलिसांनी तक्रारीनुसार तपास सुरू केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)