नगर महापालिका रणसंग्राम: हद्दपारीची कारवाई ठरली “फार्स’!

नगर शहरातच अनेक जण तळ ठोकून काहींना आदेशच बजावले गेले नाहीत

नगर: महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने शहरातील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. सुमारे 500 जणांविरोधात आतापर्यंत कारवाई झाली आहे. प्रातांधिकारी आणि तहसीलदार यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. यातील कारवाई झालेले बहुतांशी आजही नगरमध्ये तळ ठोकून आहे. त्यामुळे ही कारवाई फक्त फार्स ठरली आहे.

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या रिंगणात 715 जण आहेत. ही निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. शांततेला बाध ठरणाऱ्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांना हद्दपारी करण्याचाच त्यातील एक भाग होता. यासाठी एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्यांवर ही कारवाई करण्यात आली होती. स्थानिक पोलीस ठाण्यांनी हे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केले होते. सुमारे 681 प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. त्यात लोकप्रतिनिधींचा देखील समावेश होता. ही कारवाई टाळण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले होते. काहींनी ही कारवाई होऊ नये म्हणून विणवण्या सुरू केल्या होत्या. राजकीय दबाव आणला गेला होता. परंतु प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रस्तावावर कार्यवाही सुरू केली. यात सुमारे 500 जणांना हद्दपार करण्यात आले.

प्रातांधिकारी उज्वला गाडेकर आणि तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी हे आदेश काढले. या आदेशावर स्थानिक पोलिसांना पुढची कारवाई करायची आहे. हद्दपारीचा आदेश निघाल्यानंतर तो बजविण्यापासून ते संबंधितांना शहराबाहेर सोडण्याची सर्व काही जबाबदारी पोलिसांना करायची आहे. हा कारवाईचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा अधिकार देखील पोलिसांनाच आहे. प्रशासनाकडून आदेश पारित होण्यास शुक्रवारपासून सुरूवात झाली. ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यातील बहुतांशी नगर शहरामध्येच असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे ही कारवाई फक्त फार्सच ठरू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)