नगर महापालिका रणसंग्राम: प्रशिक्षणाच्या दांडीबहाद्दरांवर शिस्तभंगाची कारवाई

नगर: महापालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमणूक केलेल्या 2 हजार अधिकारी व कर्मचारी यांना आज दोन टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले. सहकारी सभागृहात हे प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणाला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाला काही अधिकारी व कर्मचारी गैरहजर होते.त्याचीही दखल घेण्यात आली आहे. या गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केला म्हणून शिस्तभंगाची किंवा फौजदारी स्वरुपाची कारवाईचे संकेत देण्यात आले आहे.

जिल्हा निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, रोजगार हमी योजनाचे उपजिल्हाधिकारी वामन कदम, नेवासेचे तहसीलदार सुधीर पाटील यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी तथा मनपा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी दुपारच्या सत्रात उपस्थित राहून मतदान अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, सहायक जिल्हाधिकारी प्राजीत नायर, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार सदाशिव शेलार, प्रांताधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी जयश्री माळी, तहसीलदार एफ. आर. शेख, तहसीलदार उमेश पाटील, मनपा उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदी उपस्थित होते. मनपा निवडणुक कामासाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे द्वितीय प्रशिक्षण सहकारी सहकार सभागृह येथे रविवारी आयोजित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)