नगर महापालिका रणसंग्राम: सोशल मिडियावर निवडणुकीचा ज्वर

मेसेज, फोटो व व्हिडीओचा वापर करून प्रचार

नगर: महापालिका निवडणुकीचा ज्वर आता सोशल मिडियावर चांगलाच वाढला आहे. काही सेकंदात उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या माध्यमातून करीत आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उमेदवारांनी उभी केली असून प्रतिस्पर्धीला या माध्यमातून कोंडी पकडण्याची एकचही संधी सोडण्यात येत नाही. विशेष म्हणजे उमेदवारांबरोबर राजकीय पक्षांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून पक्ष व पक्षाची ध्येयधोरण पोहविण्याचे काम करीत आहे.

ढोल-ताशे, मिरवणुका, सभा आदींपुरता मर्यादित असलेला निवडणूक प्रचार आता सोशल मिडीयावरही दिसू लागला असून, सोशल मिडीयावर महापालिका निवडणुकीचे धुमशान दिसून येत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांसह डिजिटल प्रचार करण्यावर उमेदवारांचा जोर असून, मेसेज, फोटो आणि व्हिडीओचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत सोशल मिडिया प्रभावी नव्हता. त्याचप्रमाणे त्याचा वापर करणारे ही कमी होते. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वापरकर्त्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक मतदाराला प्रत्यक्ष भेटण्यासाठी वेळ कमी पडत असल्याने उमेदवारांनी सोशल मिडीयाचा आधार घेत ऑनलाईन प्रचाराला सुरुवात केली आहे. इतर वेळी सोशल मिडीयावर कधीही न दिसणारे आता ऍक्‍टिव्ह झाले आहेत. उमेदवारांनी आपापल्या जवळच्या कार्यकर्त्यांना प्रचारासंबंधी मेसेज, फोटो, व्हिडीओ देऊन सोशल मिडीयावर प्रचार करण्यास सांगितले आहे. अनेक कार्यकर्ते आदेशाची वाट न पाहता परस्पर प्रचारास लागले आहेत. तरुणाईवर मोठा प्रभाव या नव्या माध्यमाचा पडत असल्याने सर्वच पक्षांनी या प्रचारात आघाडी घेतली आहे.निवडणुकीत सत्ता कोणत्या पक्षाची येणार, कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडूण येणार? याबाबतच्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विरोधी गटातील उमेदवारांवर आरोप करत असतानाच सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी मागील पाच वर्षात केलेली कामे, तसेच पुढील पाच वर्षातील शहराच्या विकासाचे नियोजन आदींचा प्रभाव दिसून येत आहे.

अनेक व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करून त्यात आपापल्या वार्डातील मतदारांना सदस्य बनवत आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न उमेदवार करताना दिसतात. फेसबुकवर आपल्या उमेदवाराचे छायाचित्र लोड करुन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. उमेदवाराने केलेल्या कामाची माहिती, वैयक्तिक माहिती तसेच त्यांचा अजेंडा फेसबुकवर अपलोड केला जात आहे. उमेदवार कोठे जाणार आहे, अर्ज कधी भरणार आहे, दैनंदिन कार्यक्रम अशी सविस्तर माहिती व्हॉट्‌सऍपवर तातडीने मिळत आहे. सोशल मिडियामुळे मतदारांपर्यंत पोहचणे काहीसे सोयीचे झाले आहे.

निवडणूक खर्च दाखवणे आवश्‍यक

सोशल मिडीयावर प्रचार करण्यासाठी उमेदवार हजारो रुपये खर्च करत आहेत. यासाठी लागणारे फोटो, व्हिडीओ तयार करण्यासाठी कमीतकमी 300 ते 15 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च नियमाप्रमाणे उमेदवारांनी निवडणूक खर्चात दाखवणे आवश्‍यक असताना मात्र हा खर्च दाखविण्याकडे उमेदवारांनी पाठ फिरवली आहे. सोशल मिडीयाच्या प्रचारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नसल्याने उमेदवारांचे फावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)