नगर महापालिका रणसंग्राम: भाजपने केली आचारसंहिता भंग 

शिवसेना उपनेते राठोड यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार 

नगर: महानगरपालिकेची निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

-Ads-

देशभरातील नागरिकांना पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरीत करण्याचा महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्प उभारणीत नगरचा देखील समावेश आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे. सदरचा कार्यक्रम हा माध्यमांनी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. एक प्रकारे मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा हा एक प्रकार असून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आचारसंहिता भंग केली आहे. यावर तत्काळ कारवाई व्हावी. आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे उपनेते आणि राठोड यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

देशामध्ये पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराच्या गॅसचा प्रकल्प सुरूकरणार असून त्याचे दिल्ली येथून उद्‌घाटन करण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी दोन दिवसापूर्वीच या कार्यक्रमाची घोषणा केली होती. वास्तविक पाहता नगर महानगरपालिकेची निवडणूक असतानाही या योजनेमध्ये नगर शहराचा समावेश केल्यामुळे एक प्रकारे तो अचारसंहितेचा भंग ठरणार आहे. आता निवडणुक आयोग या संदर्भात निर्णय काय घेते याकडे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
3 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)