भाजपकडून मंत्र्यांचे दौरे सुरू
नगर: भाजपकडून अनेक दिग्गज नेते, मंत्री प्रचारानिमित्त नगरमध्ये येणार आहेत. त्या अनुषंगाने आज सकाळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी नगरातील सहकारातील मंडळीबरोबर चर्चा केली. शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या गाठीभेटी ना. देशमुख यांनी दिवसभर घेतल्या. यामध्ये बॅंकिंग क्षेत्रातील नेते, सीए, डॉक्टर वकील, सामाजिक कार्यकर्ते आदींसह नित्यसेवा येथे विडी कामगार महिलांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली.
यावेळी खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, नगरसेवक महेश नवले, मनोज दुल्ल्म आदि उपस्थित होते. बॅंकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ नेते हस्तीमल मुनोत यांच्या निवास्थानी मर्चंट बॅंकेच्या संचालकांची व सीए असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मर्चंट बॅंकेचे अध्यक्ष किशोर गांधी, उपाध्यक्ष सुभाष बायड, दीनदयाळ पतसंस्थेचे वसंत लोढा, विकास पाथरकर, नरेंद्र कुलकर्णी आदींसह संचालक मंडळ उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा