नगर मनपाच्या निवडणुकीत व्यक्तिगत लक्ष घालणारः दानवे

नगर – राज्यातील इतर महानगरपालिकांप्रमाणेच नगरच्याही महानगरपालिकेत भाजपला स्वबळावर लढवून एक हाती सत्ता आणायची आहे. यासाठी खासदार दिलीप गांधी यांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी मी स्वत: या निवडणुकीत लक्ष घालणार आहे. भरपूर वेळ देणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी दिली.
खा. दानवे नगरला आले असता, त्यांनी खा.दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट दिली. सरोज गांधी यांनी पारंपारिक पद्धतीने औक्षण करुन व खा. गांधी यांनी पुष्पगुच्छ देऊन खा. दानवे यांचे स्वागत केले. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, गटनेते सुवेंद्र गांधी, श्रीकांत साठे, नितीन शेलार, बबन गोसकी, मनेष साठे आदी उपस्थित होते.
या वेळी दानवे म्हणाले, की इतर महापालिकांप्रमाणेच नगरची महापालिकेची निवडणूकही भाजप विकासाच्या मुद्यांवर लढवणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात खा. गांधी यांना यश आले आहे. त्यामुळे भविष्यात नगर शहर नक्कीच इतर मोठ्या शहरांप्रमाणेच विकसित होईल.
या वेळी खा. गांधी यांनी महापालिका निवडणुकीसाठी शहर भाजप करत असलेल्या तयारीबद्दल माहिती दिली. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विकास योजनांची माहिती, नगर शहरात झालेली विकासकामांची माहिती डिजिटल रथाद्वारे गेल्या एक महिन्यांपासून नागरिकांपर्यंत पोहचवली जात आहे. नगरच्या विकासासाठी राज्य सरकारकडून अजून भरीव निधी मिळाण्यासाठी सहकार्य करावे. तसेच मनपाच्या निवडणुकीसाठी भरपूर वेळ द्यावा, अशी मागणी खा. गांधी यांनी केली.
या वेळी खा.दानवे यांनी डिजिटल रथाची पाहणी केली. त्यावरून प्रसारित होणाऱ्या माहितीचे कौतुक केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)