नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सत्तेची भाकरी फिरविण्याची गरज (भाग दोन )

मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला लोकसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या लोकप्रतिनिधीकडून फार अपेक्षा नसतात. फक्त त्याला कार्यक्षम, पारदर्शी, नि:पक्षपाती प्रशासन हवे असते. सुरक्षित सामाजिक जीवन हवे असते.  आत्मसन्मानाबरोबरच लोकप्रतिनिधींशी थेट संवाद हवा असतो. सामाजिक समस्यावर खुली चर्चा निर्भयतेने करण्याच्या आत्मविश्‍वासाबरोबरच शुध्द पाणी, वीज, गुळगुळीत रस्ते तसेच लोकप्रतिनिधी-प्रशासन समाजासाठी नेमके काय करतात याची वस्तुनिष्ठ माहिती हवी असते. लोकप्रतिनिधी प्रश्‍नाबद्दल समाजाशी औपचारिक-अनौपचारिक चर्चा करणारा हवा असतो.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सत्तेची भाकरी फिरविण्याची गरज (भाग एक)

सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर समाजात काय वास्तविक परिस्थिती चालू आहे. सर्वसामान्यांचे सरकारच्या निर्णयावर काय मत आहे हे जाणून घेणे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे कर्तृत्व असते. दुकाने, मित्रमंडळाच्या फलकाचे उद्‌घाटन, लग्नकार्य, जेवणावळी यामध्येच सध्या लोकप्रतिनिधी बहुतांशी वेळ घालवतात. हे नक्कीच टाळता येऊ शकते. समाजाने पुढाऱ्यांची पात्रता डिजिटल पोस्टरचा आकार आणि संख्येवरून ठरवायची की त्यांनी केलेली सामाजिक कामे, त्यांची जनमानसातील प्रतिमा यावर याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. देश बदलतो आहे, घडतो आहे हे 100 टक्के जरी खरे असले तरी भारतासारख्या लोकशाही संपन्न देशात खासदार लोकप्रतिनिधीसुध्दा मनावर अधिराज्य गाजवणारा हवा म्हणूनच नगर दक्षिणेला सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणाऱ्या व या मतदारसंघाला वेगाने प्रगतिपथावर नेणाऱ्या डॉ. सुजय विखेंसारख्या लोकप्रतिनिधीची नितांत आवश्‍यकता आहे.

  अभय आव्हाड 
माजी नगराध्यक्ष, पाथर्डी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)