नगराध्यक्षांच्या केबिनवर असहकाराचा सस्पेन्स

मुख्याधिकारी हरवल्याने अधिकाऱ्यांची खाजगीत त्रिस्थळी यात्रा सुरू
सातारा, दि. 7 (प्रतिनिधी) – सातारा पालिकेत सध्या सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. उदयनराजे भोसले यांनी वारंवार एकीने काम करण्याच्या सूचना देऊन पण नगराध्यक्षांच्या केबिनवरचा असहकाराचा सस्पेन्स वाढला आहे. मुख्याधिकारी पालिकेतून हरवल्याने अधिकाऱ्यांची खाजगीत त्रिस्थळी यात्रा सुरू आहे. त्यांचे नेते खा. उदयनराजे भोसले यांचा दरारा जिह्याच्या राजकारणात आहे. मात्र श्री विसर्जनाच्या विषयावर सातारा पालिकेने स्वतःची प्रतिष्ठा हाताने वेशीला टांगली आहे. एक खिडकी योजनेचा बोजवारा उडाल्याने थेट जलमंदिरावर तक्रारी झाल्या. याचे सारे खापर मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर फुटणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात काही जणांची पाटीलकी टक्केवारीच्या नादात सातवे आसमान पर आहे. यामध्ये सातारा विकास आघाडीची राजकीय वाटचाल एकसंघ नाही. नगराध्यक्षांबरोबरचा काही नगरसेवकांचा असहकार संपलेला नाही. सैराटलेल्या काही जणांना कसे थांबवायचे यावरच आघाडीत दोन गट पडलेत. काही कर्मचारी तर चक्क बोकाळलेत, त्यांना वेळीच “वेसण’ घाला. नाही तर सातारा विकास आघाडीलाच डोईजड बनण्याची शक्‍यता व्यक्त होऊ लागली आहे.
सातारा विकास आघाडीची सत्ता आल्याने पालिकेत सर्वसामान्यांची कामे होतील असा विश्वास नागरिकांना वाटू लागला होता. परंतु अगदी नगराध्यक्षांच्या केबीनबाहेर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते बांधकाम विभागातील मुख्य अभियंता पाटील यांच्यापर्यंत अनेकजण त्यांच्याचविरोधात तक्रारी करुन आघाडीत दुफळी निर्माण होण्यासाठी उत्तेजन देत आहेत. निवडणूक विभागात तर अशी काही अ”विश्वासी’ कर्मचाऱ्यांना घेतल्याने हे केबीनबाहेरच सातत्याने घुटमळत असतात. बांधकाम विभागात प्रामाणिकपणाने काम करणारे बोटावर मोजणारेच. इतर मात्र कुरापती करण्यात मग्न. त्यामध्ये काही लिपीकही मागे नाहीत. मग मुख्य अभियंता पाटील यांचे तर सोडाच यांनी तर भाजपाच्या नगरसेवकांना सल्लेही देण्याची शाळा सुरु केली आहे. नगरविकास खात्याकडून भाजपाने दिलेला निधी सत्ताधाऱ्यांनी इतरत्र वळवला कसा यापासून ते तुम्हाला कसा मिळाला असता याचे सल्ले यांनीच केबीनमध्ये बसून दिले गेले. या पाटलांची पाटीलकी अजबच. सातारा शहरातील अनेक रस्त्यांची कामेही कशीबशीच उरकली आहेत. सदरबझार येथील पुलाचे कामही अर्धवट ठेवले आहे. ठेकेदारांशी हितसंबंध जुळले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. तोच प्रकार पाणी पुरवठा विभागात दिसतो. काही कर्मचारी लिपीक परंतु आव मात्र सभापतींचाच. सभापती शिर्के यांनी कामे सांगितली तरीही यांची लगेच ना असते. वा इतर कारणे लगेच सांगितली जातात. त्यामध्ये अनेक नळकरी तर पाणी सोडायलाही जात नाहीत, असेही समजते. आरोग्य विभागामध्ये वारंवार तक्रारी येत असल्याने सभापती वसंत लेवे यांनी थोडेसे कडक अंमलबजावणी केली खरी. परंतु याच आरोग्य कर्मचाऱ्यांना शहरात स्वच्छता करताना अनेक व्यापारी शिव्यांची लाखोली वाहतात. दमबाजी करतात. त्यावेळी युनियनचे पदाधिकारी चिडीचुप्पच राहतात. महिलाही बोलत नाहीत, अशा काही स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही तोंडी तक्रारी पत्रकारांजवळ केल्या आहेत.

नियोजन आणि शहर विकासमध्ये तर वेगळा फतवा. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई आणि बिनकामाचे टक्केवारीत मशगुल झालेले दिसतात. अनेक दिवस एकाच टेबलावर असलेले एक कर्मचारी फारच गोड बोलण्यात पटाईत त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून यांनाच नेमही ग्रीन सिग्नल दिसतो. आस्थापना विभागात तर एकेक हुशारच कर्मचारी आहेत. नियमाचे बोट दाखवत चक्क आपणच पालिकेचे सीओ असल्याचा आव आणत सगळया पालिकेत मिरवतात. यामध्ये कराडवरुन आलेले काही कर्मचारीही सातत्याने पुढे पुढे करण्यामध्ये मशगुल असतात. इकडे वसुली विभागात काम होते पण त्याला गती नाही. जरी काम करत असले तरी त्यांच्या अगोदर फोटोबाजी करणाऱ्यांचेच नेहमीच उताविळ झालेले असतात. परवा आमदारांच्या गांधीगिरीला उत्तर देण्यासाठी एका पदाधिकाऱ्याने बांधकाम विभागाने केलेल्या कामावर फुकटचे फोटोसेशन करून घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)