नगराध्यक्षांच्या कृतीबद्दल राष्ट्रवादीत संताप

 कराड : 1) कार्यक्रमातून उठून पर्णकुटीत जाऊन थांबलेल्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे.

कराड, दि. 25 (प्रतिनिधी) – नव महाराष्ट्राचे शिल्पकार, ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी आदरांजली वाहून शरद पवार व मान्यवर पर्णकुटीसमोरील कार्यक्रमाकडे गेल्यानंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे कार्यक्रमातून उठून पर्णकुटीत जाऊन थांबल्या. त्यांच्या या कृतीबद्दल राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला.
स्व. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. ते राष्ट्रीय नेते होते. त्यांचे व्यक्तिमत्व हे पक्षातीत होते. त्यांच्या पुण्यतिथीदिनी पर्णकुटीसमोर भावगीतांचा कार्यक्रम दरवर्षी होतो. या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते उपस्थित असतात. ज्येष्ठ नेते शरद पवार हे समाधीस्थळी अभिवादन करून पर्णकुटीकडे गेल्यानंतर अगोदरच तेथे बसलेल्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे या उठल्या आणि पर्णकुटीत गेल्या. त्यांच्या या कृतीमुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतप्त झाले. तसेच त्यांनी नाराजीही व्यक्त केले. प्रीतिसंगमावर कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. तसेच नगराध्यक्षांना एवढा साधा राजशिष्टाचार कळला नसावा का? माहित नसेल, तर त्यांच्या सहकारी ज्येष्ठांनी त्यांना राजशिष्टाराची माहिती द्यावी, असा संतापही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)