नगरसेविकेच्या मुलाविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल

मोबाईल स्टॉल धारकास केली मारहाण
पुणे,दि.11- कॅन्टोमेंन्ट बोर्डाच्या महिला नगरसेविकेच्या मुलासह पाच जणांवर लष्कर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका मोबाईलचे कव्हर विकणाऱ्यास त्याचा स्टॉल हलवण्यासाठी त्यांनी मारहाण केली होती. यापैकी नगरसेविकेच्या मुलासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
स्वप्निल शैलेंद्र बिडकर(21), किरण सुर्यकांत बिडकर, स्वप्निल बाळु नायकु(22), शुभम गणेश चवंडके(22,रा.सर्व लष्कर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर निलेश संजय झारखंडे याच्याविरुध्दही गुन्हा दाखल आहे.
याप्रकरणी कादीर शाह(24,रा.भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानी दिलेल्या फिर्यादीनूसार तो मोबाईल कव्हरचे स्टॅंन्ड लावून लष्कर परिसरातील अरोरा टॉवर येथे व्यवसाय करतो. शनिवारी दुपारी स्वप्निल बिडकर याने त्याला मोबाईलवर फोन करुन मी नगरसेविकेचा मुलगा बोलत आहे, तुझ्या स्टॅंड जवळची बॅग बाजूला कर माझ्या मित्राचा स्टॉल तेथे लावायचा आहे असे सांगितले. यावर फिर्यादीने धंदा असल्याने बॅग सतत जवळ ठेवावी लागते, ती बाजुला ठेऊन चालणार नाही असे स्पष्ट केले. यावर स्वप्निलने त्याला शिवीगाळ केली. यानंतर साथीदारांना घेऊन तो फिर्यादीकडे आला. तेथे वाद घालून फिर्यादीला लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. यानंतर किरण व स्वप्निल बिडकर यांनी फिर्यदीच्या डोक्‍यावर कठीण वस्तूने फटका मारला. यामध्ये फिर्यादी जखमी झाल्यावर सर्वजण तेथून पळुण गेले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी.जी.गज्जेवार करत आहेत.
यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितले की स्वप्निलची आई कॅन्टोमेंट बोर्डामध्ये विद्यमान नगरसेविका असून त्याचे वडिल माजी नगरसेवक होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)