नगरसेविका पालांडे यांच्यावर गुन्हा

  • टपरीधारकाची आत्महत्या : पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल

पिंपरी – टपरीधारकाला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे आणि आत्महत्या केलेल्या टपरीधारकाच्या पत्नीच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नेहरूनगर येथे फेब्रिकेशनचा व्यवसाय करणारे टपरीधारक सचिन सुरेश ढवळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये भाजप नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत सचिन याचा भाऊ शरद सुरेश ढवळे (वय-38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पालांडे यांच्यासह मृत सचिन ढवळे याची पत्नी शशिकला सचिन ढवळे (वय-40, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुजाता पालांडे या प्रभाग क्रमांक 20 संत तुकारामनगरच्या भाजपच्या नगरसेविका आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन याचे संत तुकारामनगर मधील गोल भाजी मंडईजवळ फॅब्रिकेशनचे टपरीवजा दुकान आहे. सोमवारी मध्यरात्री सचिन याने राहत्या घरात घरी छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन याला आत्महत्या करण्यास नगरसेविका पालांडे यांनी प्रवृत्त केले असल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)