नगरसेवक पदाचे 73 तर, नगराध्यक्ष पदाचे दोन उमेदवारी अर्ज अवैध

श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक – 2019

नगरसेवक पदासाठी 188 उमेदवार निवडणूक रिंगणात 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्रीगोंदा – श्रीगोंदा नगरपरिषदेचे सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी आज उमेदवारी अर्जांची छाननी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद दानेज यांनी केलेल्या छाननीत नगरसेवक पदासाठी 73 जणांचे तर, नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारी अर्ज अवैध झाले आहे. त्यामुळे आता 9 प्रभागात 19 जागांसाठी 148 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी 14 जणांचे अर्ज वैध ठरले आहे.

गुरुवारी श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाचे ए-बी फॉर्म न जोडणे, उमेदवारी अर्जांची सूचकची पूर्तता न करणे, जात प्रमाणपत्र वेगळ्या नावाने असणे, जात प्रमाणपत्र नसणे आदी कारणाने 73 नगरसेवक पदाचे अर्ज तर, दोन नगराध्यक्ष पदाचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. 19 जागांसाठी आता 148 तर नगराध्यक्ष पदासाठी 14 अर्ज वैध ठरले आहेत.

प्रभागनिहाय अवैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची आकडेवारी पुढील प्रमाणे :- प्रभाग क्र 1 – 16, प्रभाग क्र 2 – 8, प्रभाग क्र 3 – 6, प्रभाग क्र 4 – 7, प्रभाग क्र 5 – 11, प्रभाग क्र 6 – 3, प्रभाग क्र 7 – 5, प्रभाग क्र 8 – 12 तर, प्रभाग क्र 9 – 5 अर्ज अवैध ठरले आहे. वरील उमेदवारी अर्जामध्ये अनेकांचे पर्यायी उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडी, भाजप व शिवसेना या पक्षांचे क्रमांक 1 चे सर्व अर्ज वैध ठरल्याने उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

अन्‌ उमेदवाराने स्वाक्षरीच केली नाही
प्रभाग क्र. 8 ब मध्ये विजय गोरख शेंडगे या उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला होता. अर्जावर स्वाक्षरी नसल्याचे छाननीत शेंडगे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे. या अनोख्या घटनेची चर्चा जोरात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)