नगरसेवक खून प्रकरणी आणखी एकाला अटक

पिंपरी – आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. विजय चिखले (वय-21, रा. दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

संतोष माने आणि प्रफुल्ल गबाले या दोन आरोपींना यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या खुनातील अटक केलेल्या आरोपींची संख्या तीनवर पोचली आहे. याशिवाय या प्रकरणातील तीन अल्पवयीन मुलांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन महिन्यांपूर्वी देहूफाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीमध्ये आकाश जाधव आणि शुभम कांबळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी बालाजी कांबळे गेले होते. त्या कार्यक्रमात एका व्यक्तिशी वाद व झटापट होऊन, शिवीगाळ करत मारहाणीची घटना घडली होती. भांडणानंतर बालाजी कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्यामुळे त्यानेच कांबळे यांचा खून केल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप याने दिली आहे. त्यानुसार या गुन्ह्यातील सहभागी माने, गबाले व चिखले यांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास दिघी ठाण्याचे पोलीस निरिक्षक खंडेराव खैरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)