नगरसेवक कैलास गिरवलेंचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू झाला. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गिरवले हे अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणातील आरोपी होते.

कैलास गिरवले यांना अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणात अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर त्यांची तब्येत खालावली आणि त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे आधी अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते.

दरम्यान, ससून रुग्णालयात कैलास गिरवले यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)