नगरसेवकांनी केले “झोपा काढा’ आंदोलन

पुणे – प्रभागातील समस्या तसेच त्याबाबत वारंवार तक्रार करूनही क्षेत्रीय कार्यालयाकडून केल्या जात असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी क्षेत्रीय कार्यालयात बुधवारी “झोपा काढा’ आंदोलन केले. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या दहावी, बारावी शिष्यवृत्तीमधील जाचक अटी, त्यासाठी विद्यार्थी व पालकांना होणारा त्रास, प्रभागातील अनियमित झाडणकाम, पदपथावरील बंद दिवे अशा अनेक ज्वलंत विषयावर लक्ष वेधण्यासाठी खराडी वडगावशेरी येथे “झोपा काढा’ आंदोलन करण्यात आले. स्थानिक नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांच्यासह नारायण गलांडे, सोमनाथ साबळे चिराग टोपे, सदाशिव गायकवाड इत्यादी मंडळींनी वार्ड ऑफिसमधेच जमिनीवर झोपा काढत हे लक्षवेधी आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी माजी आमदार बापुसाहेब पठारे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या प्रश्‍नांवर 8 दिवसांत तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)