नगरसेवकांना लागू होणार राजशिष्टाचार

– पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे – महापालिकेच्या कोणत्याही विकासकामांचे उद्‌घाटन करण्याचे अधिकार महापौरांना असताना काही नगरसेवक महापौरांनाच डावलून कार्यक्रम घेतात. ही बाब राजशिष्टाचाराला धरून नाही. त्यामुळ यापुढे हा शिष्टाचार प्रत्येक नगरसेवकाने पाळावा, असा निर्णय बुधवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

-Ads-

नगरसेवकांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्‌घाटनाचे अधिकार महापौरांना आहेत. तसेच या कार्यक्रमांना एखाद्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण द्यायचे असल्यास त्यासाठी महापौरांचे पत्र देणे आवश्‍यक आहे. मात्र, महापौरांना या कार्यक्रमाची काहीच कल्पना न देता थेट कार्यक्रम घेतले जात असून, त्यासाठी पालिकेचीच यंत्रणा वापरली जात आहे.

याशिवाय, प्रभागातील इतर पक्षांच्या नगरसेवकांनाही निमंत्रण दिले जात नाही. हे प्रकार वारंवार घडत असल्याने, महापौरांनीच सर्व नगरसेवकांना पत्र पाठवून राजशिष्टाचार पाळला जावा, अशा सूचना केल्या. या पत्रावर पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. असे प्रकार कोणत्याही शिष्टाचाराला धरून नसल्याचे सर्व पक्षनेत्यांनी यावेळी मान्य केले. तसेच सर्व नगरसेवकांना याबाबत सूचना दिल्या जाव्यात, तसेच या पुढे असे कार्यक्रम महापालिकेचे अधिकृत समजू नयेत, तसेच या कार्यक्रमांसाठी महापालिकेची यंत्रणा तसेच कोणताही निधी खर्च करू नये असा निर्णय घेतल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

नगरसेवकांना मिळणार उत्कृष्ट वक्ता पुरस्कार
महापालिकेच्या मुख्यसभेत नागरिकांशी संबंधित प्रश्‍न मांडणाऱ्या एका नगरसेवकास दरवर्षी स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने उत्कृष्ट वक्ता पुरस्कार दिला जाणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावासही पक्षनेत्यांच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून या वर्षीपासून हा पुरस्कार दिला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)