नगरसेवकांचे नगराध्यक्षांच्या विरोधात कोल्ड वॉर

18 डिसेंबरच्या स्थायी समितीच्या सभेत शीतयुद्ध होण्याची चिन्हे

सातारा, दि. 15 (प्रतिनिधी)-खासदार उदयनराजे भोसले यांचे आगामी लोकसभेसाठी शड्डू सुरु असताना सातारा विकास आघाडीमध्ये मात्र नगरसेवकांचे नगराध्यक्षांच्या विरोधात कोल्ड वॉर सुरू आहे. 18 डिसेंबरच्या स्थायी समितीच्या सभेत शीतयुद्ध होण्याची चिन्हे आहेत. वार्षिक दर मंजूरीचा अट्टाहास इतका की इतर सभापतींचे विषय च जाणीवपूर्वक अडवण्यात शॅडो कॅबिनेटने धन्यता मानली. एकमेकांचे विषय डावलण्याचे कुरघोड्यांचे राजकारण अद्याप सुरूच आहे. उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष यांच्यात कोल्ड वॉर सुरूच आहे. पण नेत्यांना बोलायचे कसे ही खरी पंचायत आहे.नगराध्यक्ष आम्हाला विश्वासात घेत नसल्याची तक्रार साविआतल्या एका गटाने खाजगीत केली असून पुन्हा नगराध्यक्षांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दुसरीकडे उदयनराजे यांचे नाव सांगून परस्पर तयार झालेल्या अजेंड्यावर नगराध्यक्षांना सही करण्यचे निरोप धाडले जातात. त्यामुळे नगराध्यक्षांचे घटनात्मक अधिकार अडचणीत आणण्याची सुरू असलेली राजकीय खेळी ही सातारकरांना अस्वस्थ करणारी आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन एकदिलाने काम करण्याची तंबी नगरसेवकांना दिली होती. मात्र या तंबीचा कोणताच उपयोग झाला नसून अजूनही गटातटाचे राजकारण सुरूच असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. 18 डिसेंबर रोजी स्थायी समितीच्या सभेत 103 विषयांना मंजूरी देण्यात येणार आहे. या सभेवर नगरविकास आघाडी लक्ष ठेवून आहे. अशोक मोने यांनी सातारकरांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. मात्र त्या राजकीय निशाण्यावर येऊनही सातारा विकास आघाडीच्या तंबूत मात्र चक्क विसंवादाचे कोल्ड वॉर सुरू आहे. पुन्हा नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या केबिनमध्ये पुढील स्थायी समितीची सभा मुदतीत घेण्याची चर्चा होती. विरोधकांचे कोणते विषय डावलले गेले याचीही तपशीलवार माहिती नगराध्यक्षांनी घेतली. मात्र विरोधकापेक्षा साविआच्याच नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात तक्रारी सुरू केल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वसाधारण सभेसाठी विषय मागवताना साविआच्याच नगरसेवकांचे विषय सहेतुकपणे गाळले जातात अशी ओरड सुरु झाल्याने साविआत अंर्तगत दोन गट एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांना केवळ अकरा महिने उरले आहेत. विकास कामांच्या नावाखाली सातारा शहराच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्याने सातारकरांच्यामध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे लोकसभेची लढाई आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या थेट विरोधाने उदयनराजे यांच्यासाठी सोपी नाही. त्याचे कोणतेही भान नसलेल्या नगरसेवकांनी मात्र स्वतःच्या वॉर्डातील कामांचा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)