नगरसेवकांचा विमा काढण्यास कॉंग्रेसचा विरोध

पिंपरी – महापालिकेतील नगरसेवक व त्यांच्या कुटूंबियांसाठी करदात्या नागरिकांच्या पैशातून आरोग्य विमा काढण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे.

हा ठराव सर्व साधारण सभेने रद्द करावा. अशा पध्दतीने विमा काढणे म्हणजे करदात्या जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा उद्योग आहे. जनतेच्या पैशावर नगरसेवकांचा विमा कशासाठी, या विमा उद्योगामुळे नेमके कोणाचे आरोग्य सुधारणार आहे. असा प्रश्न कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे उपस्थित केला आहे.

त्यांनी म्हटले आहे की, प्रत्यक्षात नागरिकांचे सर्वांगिण आरोग्य सुदृढ ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नगरसेवकांच्या आरोग्याची एवढी काळजी प्रशासनाला असेल तर त्यांनी शहरातील सर्वच करदात्या नागरिकांचा आरोग्य विमा काढावा. नगरसेवक हे सेवेचे पद आहे. परंतु, चहूबाजूंनी भ्रष्टाचारात गुरफटलेल्या प्रशासनाला व सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या आयुक्तांना पदाधिकाऱ्यांचे लांगूलचालन करण्यातच धन्यता वाटते. सर्व साधारण सभेने हा ठराव रद्द करावा अन्यथा कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा तसेच वेळप्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सचिन साठे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)