नगरला मुंबईतून राजकीय धक्के ; घुले, ढाकणे, कळमकर लोकसभेसाठी चर्चेत

आ. जगताप, प्रा. गाडे, राठोड यांना निर्णयप्रक्रियेतून पक्षनेतृत्वांनी वगळले ; शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

नगर: राज्याच्या राजकीय पटलावर नगर शहरातील राजकारणाचे महत्त्व वेगळेच आहे. राज्य नेतृत्वांना देखील नगरी राजकारणाची दखल घ्यावी लागते. याकडे दुर्लक्ष केल्यास नगरमधून मुंबईला राजकीय धक्के बसतात. यावेळी मात्र नगरच्या राजकारणाबाबत वारे उलटे वाहू लागले आहेत. मुंबईतून नगरला आज राजकीय धक्के बसले आहे. नगर शहरातील राजकारणावर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची पकड आहे. हे धक्के भविष्यात नगरसह राज्याच्या राजकीय पटलावर वेगळे चित्र निर्माण करू शकतात, असे सांगितले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे अधिकारात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटविले असून, त्यांच्याबरोबरीला राजेंद्र दळवी यांची नगर दक्षिण जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती दिली आहे. शिवसेनेच्या राज्यपातळीवरच्या निर्णय प्रक्रियेत, विशेष करून नगरशी संबंधित विषयांबाबत तरी उपनेते अनिल राठोड यांना विचारात घेतले जाते. प्रा. गाडे व दळवी यांच्याबाबत तसे झाले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अरुण जगताप यांना देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई येथील पक्ष बैठकीला निरोपच देण्यात आला नाही. यावेळी मात्र, जगताप यांना बैठकीलाच निरोप नसल्याने नगरच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि. 5) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई येथील बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत नगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवगावचे माजी आमदार नरेंद्र घुले, प्रताप ढाकणे आणि ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांच्या नावावर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचे नाव कोणीतरी सुचविले असल्याचा खुलासा खुद्द शरद पवार यांनी केला. बैठकीत पवार यांनी आघाडीच्या जागावाटपात नगर लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसला सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात बहुतांशी जागांचे निर्णय झाले असले तरी नगर लोकसभेच्या जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. अशा स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीच्या तयारीसाठी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी सकाळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह खा.सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नगरचे प्रभारी दिलीप वळसे पाटील, अंकुशराव काकडे, शिवाजीराव गर्जे, हेमंत टकले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, चंद्रशेखर घुले पाटील, पांडुरंग अभंग, प्रताप ढाकणे, उदय शेळके, प्रशांत गायकवाड, अभिषेक कळमकर, किरण काळे आदी उपस्थित होते.

नगर लोकसभेची जागा कॉंग्रेसला सोडण्याच्या विषयावर कुठलीही चर्चा न करता दक्षिणेची जागा निवडणून आणण्यासाठी तालुकापातळीपर्यंत नियोजन करुन कामाला लागा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी कळमकर, घुले, ढाकणे यांच्यासह प्रा. निमसे यांच्या नावावर चर्चा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)