नगरमध्ये धर्मा पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता टळली

नगर – वीजजोडणी आणि रस्त्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका शेतकऱ्याचे प्राण प्रेस क्‍लबचे अध्यक्ष मन्सुरभाई शेख व ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे या पत्रकारांनी वाचवले. त्यामुळे धर्मा पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता टळली.

बातमी देणं हे पत्रकाराचं काम आहे. मात्र, एखादी दुर्घटना घडत असताना आपल्याला चांगली बातमी मिळेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणं हे पत्रकाराचं काम असू शकत नाही ही जाणीव ठेवत नगरचे पत्रकार सातत्याने आपल्यामधील सामाजिक जाणिवांचा परिचय करून देत असतात. काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी झालेल्या एका महिलेला तातडीने रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या पत्रकारांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले होते. असेच माणुसकीचे दर्शन गुरुवारी (दि. 22) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडले.
याबाबत सविस्तर असे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका शेतकऱ्याचे प्राण वाचवून केवळ बातमी देणं एवढंच आमचं काम नाही याचा प्रत्यय या दोन पत्रकारांनी जगाला आणून दिला. एक शेतकरी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना अनेक जण पाहत होते. मात्र, पुढे जाऊन त्याला रोखावं असं कोणालही वाटलं नाही. यावेळी प्रेस क्‍लबचे अध्यक्ष मन्सूरभाई व ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा ते धावले आणि त्यांनी शेतकऱ्याच्या हातातील रॉकेलचा डबा काढून घेतला. यावेळी गडबड गोंधळ झाल्यामुळे नागरिकांसह पोलीसही घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शेतकऱ्याला ताब्यात घेतले.
जागरुकता व समयसूचकता, तसेच संवेदनशीलतेचा परिचय देत पत्रकारांनी एका शेतकऱ्याचे प्राण वाचविले. समाजासाठी पत्रकारिता असावी ही भूमिका घेऊन मन्सूरभाई व महेश देशपांडे यांनी शेतकऱ्याचे प्राण वाचविले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)