नगरमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना “कारणे दाखवा’ नोटीस

File photo

सात दिवसात लेखी खुलासा करण्याचे आदेश

मुंबई: आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज्यात शिवसेना-भाजप युतीविरोधात कॉंग्रेससह समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला आहे. अशा परिस्थितीत अहमदनगरमध्ये आज झालेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपाला पाठिंबा देऊन पक्षाला अडचणीत आणले आहे. भाजपसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांना “कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अहमदनगर महानगरपालिकेसाठी झालेल्या निवडणूकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या पालिकेवर सत्ता कोणाची येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज महापौर व उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणूकीवर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने तेथे “कमळा’ला पाठिंबा देत भाजपाची सत्ता प्रस्थापित करण्यास मदत केली.

स्थानिक नगरसेवकांनी भाजपाला पाठींबा दिल्याबद्दल कॉंग्रेससोबतच्या आघाडीबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. राजकिय वर्तुळात तशी चर्चाही सुरु झाली आहे. आघाडीचे संबंध बिघडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

निवडणूका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने समविचारी पक्षांशी आघाडी करुन लढवली होती. महापौर-उपमहापौर निवडणूकीमध्ये भाजप-शिवसेना या पक्षांना पाठींबा देवू नये अथवा त्यांच्या बाजुने मतदान करु नये असे स्पष्ट आदेश पक्षाच्यावतीने असतानाही भाजपाला मतदान करुन पक्षादेश डावलला आहे असेही नवाब मलिक म्हणाले. त्यामुळे पक्षादेशाचे पालन न केल्याच्या कारणामुळे कायदेशीर कारवाई का करण्यात येवू नये असे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. शिवाय याबाबतचा खुलासा येत्या सात दिवसांमध्ये करावा, असेही त्या नगरसेवकांना समज देण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)