नगरमधील दंग्यात 57 जणांविरोधात गुन्हा

नगर: शहराच्या मध्यवर्ती भागातील वंजारगल्लीतील दंग्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, 57 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्याला आला आहे. विशाल होंडे (रा. वंजारगल्ली) आणि तन्वीर पठाण (रा. कोठला) यांनी या फिर्याद दिल्या आहेत. नगरसेवक मुदस्सर शेख व माजी नगरसेवक सतीश मैड यांचाही दंग्यात समावेश आहे. तशी फिर्यादीत नोंद आहे.

होंडे याच्या फिर्यादीनुसार साबीर सादीक सय्यद, तन्वीर पठाण, जमील इबू शेख, नीसार शेख अल्ताफ शेख, शानू सय्यद, तौफीक लाला शेख, नूरमोहमंद अजरुद्दीन शेख, फरदीन सय्यद, अल्ताफ शकील सय्यद, तौफीक लाला शेख,आबीद रफीक शेख, इप्पू कुरेशी, इरफान शेख, नदीम शकील सय्यद, नगरसेवक मुदस्सर जहांगीर शेख यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मी आणि माझा मित्र रोहित फंड दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दोघांनी कट मारला. त्यावेळी त्यांना गाडी नीट चालव असे सांगितले. यावर दुचाकीवरील दोघांनी तुम्हाला दाखवितो, असे सांगून निघून गेले आणि सात ते आठ दुचाकीवर बसून मुले आले. त्यात नगरसेवक मुदस्सर शेख देखील होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तलवारी, लाकडे दांडके, गज, दगडफेक करत मारहाण करण्यास सुरूवात केल्याचे होंडे याने फिर्यादीत म्हटले आहे. पठाण याच्या फिर्यादीनुसार जोशी वस्ताद, विशाल होंडे, मयूर सतीश मैड, बंडू ऊर्फ सनी मुर्तडकर, आदित्य गवळी, रोहीत फंड ऊर्फ रोज्या, गोपाळ मालपाणी, राकेश वाडेकर, सौरभ न्हावरे, सतीश मैड, वैभव होंडे यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वंजारगल्लीत काही मुलांची मारामाऱ्या सुरू होत्या. तेव्हा मी तेथून दुचाकीवरून जात होतो. पुढे काही मुले पळत होते. त्यावेळी वंजारगल्लीतील मुले त्यांच्यावर दगडफेक करत होते. या जमावाने माझ्यावर देखील हल्ला करत मारहाण केली, असे पठाण याने फिर्यादीत म्हटले आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)