नगरपालिकेत पं. जवाहरलाल नेहरु यांना अभिवादन

फलटण, दि. 14 ( प्रतिनिधी) आधुनिक भारताचे शिल्पकार तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. आज त्यांच्या जन्मदिनी फलटणमध्ये नगरपरिषदेच्यावतीने पंडित नेहरु यांना अभिवादन करण्यात आले. तसेच बारस्कर गल्ली येथे असलेल्या पंडित नेहरु यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
बालदिनानिमित्त लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अजय माळवे, अभिजित भोसले, नगरपरिषदेचे नगरअभियंता (बांधकाम विभाग) पंढरीनाथ साठे, कार्यालयीन निरिक्षक मुस्ताक महात ओबीसी सेलचे अध्यक्ष सिकंदर ङांगे आणि सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)