नगरपालिकेच्या शाळांमध्ये गोवर रुबेला लसीकरणास शुभारंभ

कराड – येथील नगरपालिकेच्या शाळांमध्ये बुधवारी गोवर रुबेला लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. पालिका शाळांमध्ये लसीकरण झाल्यानंतर शहरातील इतर खासगी शाळांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहिमेंतर्गत 9 महिने ते पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

यावेळी नगरपालिका शाळेतील एकूण एक हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. स्व. सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमने पालिका शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना लसीकरण केले. हे लसीकरण पहिल्यांदाच केले जात असल्याने मुलांसोबत पालकांनाही शाळांमध्ये बोलाविण्यात आले होते. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य सभापती प्रियांका यादव यांनीही शाळांना भेटी देवून लसीकरणाची माहिती घेतली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)