नगरपालिकेचे सभा सचिव काळे यांच्या विरोधात तक्रार

कार्यवृतांतामध्ये परस्पर बदल व खाडाखोड केली
सातारा-विशेष सभेच्या कार्यवृतांतामध्ये परस्पर बदल व खाडाखोड केल्या प्रकरणी सातारा नगरपालिकेचे सभा सचिव राजेश काळे यांच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी गुरुवारी तक्रार केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद विभागाने याचा सविस्तर अहवाल करण्याचे आदेश दिल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद आहे की 29 ऑगस्ट 2018 रोजी पालिकेची विशेष सभा पार पडली. गणेश विसर्जना संदर्भात विचार विनिमय करणे हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला होता. या ठरावाला सूचक वसंत लेवे व अनुमोदक राजू भोसले होते. या ठरावाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार पुनरावलोकन याचिका दाखल करण्याच्या ठरावावर नगराध्यक्षांची सही होती. मात्र माहिती अधिकारात या ठरावाची जी कागदपत्रे मागवण्यात आली त्यामध्ये विषय क्रमांक एक ठराव क्रमांक 31 मध्ये मूळ ठरावात बदल केल्याचे लक्षात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर ठरावाच्या कागदपत्रांवर सत्य प्रत म्हणून मुख्याधिकाऱ्यांच्या सह्या होत्या. पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. या ठरावा ऐवजी याचिकेसाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देउन पुढील कार्यवाहीचे अधिकार मुख्याधिकाऱ्यांना देण्यात येत आहे असा बदल करण्यात आला आहे. अभिलेखात फेरफार करणे, त्यात खाडाखोड करणे, या स्वरूपाचे गंभीर आरोप करून सभा सचिव राजेश काळे यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी केली.

जिल्हा प्रशासन अधिकारी रविंद्र पवार यांनी या प्रकरणाचा स्वयं स्पष्ट अहवाल मुख्याधिकाऱ्यांना मागितल्याने पालिका प्रशासनाची गोची झाली आहे. मात्र कोजागिरी राडा प्रकरणाचा धसका घेतलेल्या मुख्याधिकाऱ्यांनी तीन दिवस घरातच सक्‍तीचा विजनवास पत्करला आहे. त्यामुळे ते काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)