नगरपरिषदेमध्ये सर्व पर्यवेक्षक व केंद्रस्तरिय अधिकारी बीएलओ यांची बैठक

सातारा- केंद्रीय व राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या दिव्यांग मतदारांची स्वतंत्र मतदार यादी तयार करणे, तसेच व्यापक स्वरुपात मतदार नोंदणी कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी नगरपरिषदेमध्ये सर्व पर्यवेक्षक व केंद्रस्तरिय अधिकारी बीएलओ यांची बैठक आयोजित केली होती.

या कार्यक्रमाअतंर्गत प्रत्येक बीएलओ यांनी आपआपल्या नेमुन दिलेल्या भागातील दिव्यांग मतदारांची स्वतंत्र यादी तसेच ज्यांच्या क्षेत्रांमध्ये झोपडपट्टी असेल त्यांनी त्या ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन करायचे आहे. मयत मतदारांची नांवे रद्द करायची आहेत. ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नसतील त्यांना भेट देउन ते प्राप्त करायचे आहेत.

-Ads-

गोरे यांनी, निवडणुक आयोगाचा हा कार्यक्रम यशस्वी करावा अशा सूचना दिल्या. या बैठकीस निवडणूक विभागाचे अनिल भोसले व सर्व पर्यवेक्षक व 60 बीएलओ उपस्थित होते. बैठकीस गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी गोरे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)