नगरपरिषदेच्या सफाई कामगारांची आरोग्य तपासणी

शेवगाव: नगरपरीषदेच्या आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांची रोटरी क्‍लब व इनरव्हील क्‍लबने आरोग्य तपासणी करून, सामाजिक उत्तरदायित्व निभावले आहे. यावेळी जिल्हा परीषदेच्या आरोग्य केंद्रामध्ये 70 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या नगरपरीषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे स्वत:च्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने व सातत्याने कचरा, दुर्गंधी, गटार यांच्या संपर्कात आल्याने त्यांना विविध रोगराईचा सामना करावा लागतो. त्यामुळे नगरपरीषद, रोटरी क्‍लब व इनरव्हील क्‍लबच्यावतीने त्यांच्याकडून होत असलेल्या शहरवासियांच्या सेवेप्रती हे आरोग्य शिबीर आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्ये रक्त, हृदयरोग, ईसीजी आणि फुप्फुस आदी विकारांची तपासणी डॉ. संजय लड्डा, डॉ. सुयोग बाहेती, डॉ. गणेश चेके, डॉ. दिनेश राठी यांनी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नगराध्यक्षा राणी मोहिते, रोटरीचे अध्यक्ष प्रा. दिलीप फलके, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, इनरव्हीलच्या अध्यक्षा लीना सबलोक यांच्यासह नगरपरीषदेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)