नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराची दूरवस्था

गुरूनाथ जाधव

सातारा –
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (दादा महाराज) भोसले यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या सातारा नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराची दुरावस्था झाली आहे.या प्रवेश द्वाराच्या रेलींग सोबत फरश्‍या देखील निखळू लागल्या आहेत. काही ठिकाणच्या फरश्‍या तुटल्या असून त्याची डागडूजी करणे अत्यावश्‍यक बनले आहे. याच प्रवेशद्वाराला वड तसेच पिंपळाच्या झाडांनी देखील विळखा घातला आहे. या प्रवेशद्वाराच्या परिसरात तसेच अवती भवती घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे

सध्या या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या निखळलतील की काय अशी अवस्था बनली आहे. नगरपरिषदेत प्रवेश करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दुतर्फा पायऱ्या व भव्य रेलिंग आकर्षक पध्दतीने बांधण्यात आले. मात्र आता हे रेलिंग पडायला आले आहे. या रेलिंग बसविलेल्या पायरी मार्गावर बहुतांश भागाला भेगा पडल्या असून सातत्याने वर्दळ असल्याने रेलिंगच्या दोन्ही बाजूकडील तळातील भाग देखील मोडकळीस आला असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रवेशद्वारातील स्टाईलच्या फरश्‍या निसटू लागल्या आहेत. याची तातडीनं डागडूजी करणे अत्यावश्‍यक बनले आहे. सातारा शहरामध्ये दैनंदिन नगरपरिषदेत येणाऱ्या नागरिकांचे लक्ष या निखळलेल्या फरश्‍याकडे आकर्षीत होत आहे. पालीकेच्या दारीच जर असे दुर्लक्ष तर सातारा शहराचे काय? असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)