नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

वडूज – येथील नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असून शासन मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत कामबंद करीत दिवसभर ठिय्या मांडला होता.

आंदोलनात अंकुश गोडसे, मदन गोडसे, शिवाजी फडतरे, संदीप फडतरे, राजेंद्र काटकर,विशाल बैले, धनाजी कांबळे, विजय शिंदे, पिंटू जाधव आदीसह सर्व विभागाचे कर्मचारी ,महिला कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, उपनगराध्यक्ष विपूल गोडसे, सर्व नगरसेवक, बाजार समितीचे संचालक विजय काळे, बबलू पवार आदीसह ग्रामस्थांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)