नगरच्या लष्करी तळाची तिघांकडून टेहाळणी

पारनेरमधील युवकासह उत्तरप्रदेशमधील दोघांना लष्कराने घेतले ताब्यात

नगर: नगरच्या लष्करी तळाची टेहाळणी करणाऱ्या तिघा युवकांना लष्करी जवानांनी पकडले आहे. यातील एक जण पारनेरचा असून, त्यांच्या अंगावर लष्करी गणवेश होता. भिंगार कॅम्प पोलिसांनी या तिघांविरोधात लष्करीतळात अनाधिकाराने प्रवेश करून टेहाळणी केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. नायक सुभेदार भूपेंदर सिंग यांनी फिर्याद दिली आहे. प्रदीप सीताराम शिंदे (रा. पारनेर), रिजवान एजाज अली व सोनू नयाजुद्दीन चौधरी (दोघे रा. सोरम, बुढाना, शाहपूर, मुझफ्फरनगर, उत्तरप्रदेश) या तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील गुन्ह्याचा तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरच्या जामखेड रोडवर एसीसी ऍण्ड स्कूल आर्मड सेंटर आहे. या लष्करी तळावर नागरिकांनी प्रवेश बंदी आहे. काही मोजकेच रस्ते असे आहेत, की तिथून नागरिकांना जाते-येता येते. त्यासाठी हेल्मेटसह ओळखपत्रांची आवश्‍यकता असते. या रस्त्यावर जागोजागी लष्काराचे चेकपोस्ट आहेत. अशी कडक सुरक्षा व्यवस्था असताना देखील लष्करी तळाच्या मुख्यालयापर्यंत तिघे पोहचल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात एक जण अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्‍यातील आहे, तर दोघे उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील आहेत. पारनेरमधील युवक हा लष्करी गणवेशात होता, हे विशेष! तोच या मुझफ्फरनगरमधील दोन युवकांना घेऊन लष्करी तळावर घुसला होता.

नायक सुभेदार भूपेंदर सिंग आणि त्यांच्या सोबत असलेले हवालदार जी. बी. थापा, हवालदार जसवीरसिंग, हवालदार विजयसिंग हे एसीसी ऍण्ड गुरूवारी दुपारी एक वाजता स्कूल आर्मडचा परिसराची तपासणी करत होते. त्यावेळी त्रिशुल चौकात प्रदीप शिंदे हा लष्करी गणवेशात दुचाकीवरून लष्करी तळात घुसला होता.

त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या दुचाकीवर रिजवान अली आणि सोनू चौधरी हे दोघे होते. या दोघांच्या डोक्‍यावर हेल्मेट नव्हते. त्यामुळे त्यांना थांबविण्यात आले. विचारपूस सुरू केल्यावर तिघांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. प्रदीप शिंदे याचे ओळखपत्र तपासल्यावर त्यावरील छायाचित्रावर शिक्का नव्हता. तो लष्करी जवान नसल्याचे लक्षात आले. त्यावरून हे लष्करी तळाची टेहाळणी करत असल्याचे संशय बळावला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले. लष्काराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर या तिघांची तपासणी आणि ओळख परेड घेतल्यावर प्रदीप शिंदे हा लष्करी जवान नसल्याचे पुढे आले.


शिंदे, चौधरी आणि आलीकडून 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रदीप शिंदे यांच्याकडून दोन मोबाईल, दुचाकी, ओळखपत्र, उपहारगृहाचे ओळखपत्र, मतदान काड, पॅन कार्ड, सेफ गार्डीनंचे ओळखपत्र, सोमनाथ भापकर यांच्या नावाची दोन एटीएम कार्ड, युनियन बॅंकेचे एटीएम कार्ड, वाहन परवाना, सोनू चौधरी याच्याकडून वाहन परवाना, पॅन आणि आधार कार्ड, मोबाईल आणि रिजवान अलीकडून दोन तीन मोबाईल, त्यात एक आय-फोन आणि दुचाकी, असा एकूण 33 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)