नगरच्या रजत व रियाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

ऐरोबिक्‌ फिटनेस रॅंकींगमध्ये उच्चस्थान

नगर – नेदरलॅण्ड येथे झालेल्या फिसा इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2018 या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्टस्‌ ऐरोबिक्‌ फिटनेस खेळामध्ये नगरच्या रजत मनियार व रिया मनियार या राष्ट्रीय खेळाडूंनी लहान गटात चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक व रॅकिंगमध्ये उच्चस्थान पटकाविले.
16 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान नेदरलॅण्ड येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रजत मनियार याने वैयक्तिक गटात सुवर्णपदक व डबल मिक्‍स गटात रॅकिंगमध्ये 5 वे स्थान पटाकविले. तसेच रिया मनियार हिने रॅकिंगमध्ये 13 वे स्थान पटकाविले. या दोघांनाही विशेष सन्मानित या स्पर्धेत करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या रजत व रिया या राष्ट्रीय खेळाडूंचे नेदरलॅण्डहून नगरमध्ये आगमन झाल्यावर त्यांची तेलीखुंट, दाळमंडई परिसरातून सवाद्य मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी मोहन बरमेचा, जितेंद्र बिहाणी, नरेंद्र फिरोदिया, मोहन मानधना, गिरीष अग्रवाल, निर्मल मुथा, मनिष मुंदडा, किरण भंडारी, कमलेश भंडारी, अमित मुथा, पवन गांधी, आनंद फिरोदिया, योगेश चंगेडिया, गौरव झंवर, भूषण मालू, किरण मनियार, रिना मनियार, हरिकिसन मनियार, राजलक्ष्मी मनियार, पुरुषोत्तम मनियार, देवकिसन मनियार, गोपाल मनियार, गोविंद मनियार आदिंसह विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)