नगरचे पाणी शुद्धच जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचा निर्वाळा

नगर -नगर शहराला होत असलेला पाणी पुरवठा शुद्धच असल्याचा निर्वाळा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या वतीने देण्यात आला आहे. हि प्रयोगशाळा जिल्ह्यातून येणारे पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून त्याच्या शुद्ध -अशुद्धतेचे अहवाल देत असते. तसेच पाणी दुषीत असल्यास त्याबद्दलच्या सुचना संबंधीत संस्थांना देत असते.

आरोग्य केंद्राच्या अहवालानुसार मनपाच्या वतीने होणाऱ्या पाणी पुरवठ्यातील विविध परिसरातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळे पर्यंत पोहोचविण्यासाठी दोन कर्मचारी नेमले असून त्यांच्याकडुन महिन्याकाठी 100 ते 130 नमुने तपासणीसाठी आणले जातात . त्यानमुन्यांचे परिक्षण करून त्याचा अदवाल तातडीने मनपाला कळविला जातो.

एप्रिल मह्न्यिात मनपाच्या हद्दीतील 128 नमुने तपासले मात्र त्यातील एकहि नमुना सदोष आढळला नाही. तर याच प्रयोगशाळेतून खासगीरित्या 40 नमुने तपासले गेले त्यातील 8 नमुने सदोष आढळून आले.
सामाजिक कार्यकर्ते सुहास मुळे यांनीही एक नमुना तपासुन घेतलामात्र तो सदोष निघाला. असे असले तरीही शहराला होणारा पाणी पुरवठा शुद्धच असल्याची माहिती प्रयोग शाळेच्या वतीने देण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)