नगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव

शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव

नगर शहरामध्ये सर्वच पायाभूत सुविधांचा अभाव आहे, मात्र त्यापेक्षाही सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय आज मला अनाथ मुलांचा तसेच वृद्धांचा वाटतो, ज्या मुलांवरील मायेचे छत हरपले आहे, अशा मुलांसाठी महापालिकेने अनाथश्रमे सुरू करण्याची गरज आहे. त्याचबरोबर वृद्धावस्थेत घरचे सगे-सोयरे कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाही, त्यांना बेघर करतात, अशा वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याची गरज आहे. अनेक सामाजिक संस्था यावर खर्च करतात, मात्र पालिमार्फतदेखील याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सीमा मौर्य, बोल्हेगाव फाटा


अनधिकृत होर्डिंगवर कारवाई व्हावी

शहरामध्ये विविध ठिकाणी जाहिरातीसाठी मोठे होर्डींग लावलेले आहेत, यामध्ये काही प्रमाणात अधिकृत जागेत तसेच काही अनधिकृत जागेत होर्डींग बसविण्यात आले आहेत, दिल्लीगेट ते लालटाकी परिसरात एक महाविद्यालय असल्याने येथे अधिक प्रमाणात होर्डींग लावलेले दिसून येतात, ते होर्डींग अधिक प्रमाणात रस्त्याजवळच असल्याने वाहनचालकांना समोरून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या भागामध्ये अपघातांचे प्रमाणदेखील वाढलेले आहे. या गोष्टीकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

– विजय काकडे, चांदणी चौक परिसर


ऐतिहासिक वास्तूंचे जतन करावे

शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. महापालिकेच्या क्षेत्रामध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तुंचे जतन करून त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीच्या मुद्यावरून दिल्लीगेट वेस आणि माळीवाडा वेस पाडण्याचा निर्णय मध्यंतरीच्या काळात सुरू होता, या वास्तू आपल्या इतिहासाच्या खूना आहेत, महापालिकेने ते पाडण्याचा निर्णय न घेता, पर्यायी रस्त्यांचा विचार करावा.

मयुरी चावडे, दिल्लीगेट


ई-रिक्षांचा उपक्रम राबवावा

दिवसेंदिवस शहराचा विस्तार वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, शहराची रचना, रस्ते, पाण्याची सोय यांत बदल करण्याची आवश्‍यकता आहे. आज शहरातील बससेवा पूर्णतः बंद आहे, जर महापालिकेला शहर बससेवा पुरविणे शक्‍य होत नसेल, तर त्यांनी ई-रिक्षांचा उपक्रम हाती घ्यावा. त्यामुळे खासगी रिक्षाचालकांकडून होणरी प्रवाशांची लूट थांबेल.

महेश पवार, सुडके मळा


पार्किंगचा प्रश्‍न गंभीर

शहरातील सारसनगर परिसरात बाजार समिती असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी अधिक प्रमाणात होते, या भागात कोणतेही वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. वाहने जागा मिळेल त्याठिकाणी उभी केलेली दिसून येतात, त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

योगेश पालवे, सारसनगर


परिसरात गार्डन व्हावे

या परिसरात अनेक वर्षापासून मोकळ्या पडलेल्या जागेत गार्डन करणे आवश्‍यक आहे. या मोकळ्या जागेत कचरा टाकल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. या प्रभागातील रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्याची डागडूजी करणे आवश्‍यक आहे.

– राजेंद्र गारदे, गायकवाड मळा.


शासकीय वाचनालय असावे

या परिसरात रस्ते व्यवस्थित आहेत. विजेचे नियोजन आहे. पथदिवे सुस्थितीत आहेत. कचरागाडी वेळेवर येते. या परिसरात शालेय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वाचनालयाची असावे. तसेच रस्त्याच्या कडेला कचराकुंड्याची आवश्‍यकता आहे.
– राहुल पेटकर, बालिकाश्रम रोड.


पोलिसांनी गस्त वाढवावी

या भागातील रस्ते सुस्थितीत आहेत. पथदिवे आहेत. पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. पाण्याच्या अनियमिततेमुळे अनेकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नोकरदार वर्गाची यामुळे नेहमीच धांदल उडते. तसेच या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, त्यामुळे रात्रीच्या वेळी उनाडक्‍या करणाऱ्यांना जरब बसेल. तसेच रस्त्यांच्या कडेला कचराकुंड्या बसवणे आवश्‍यक आहे.

– रामदास सोनवणे, प्रेमदान चौक.


स्वच्छतेची आवश्‍यकता

या परिसरातील पथदिवे बंद आहेत. रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या कडेला कचराकुंड्या आहेत. मात्र तरीही रस्त्याच्याकडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता आहे. या कचराकुंड्याचे योग्य व्यवस्थापन करून परिसर स्वच्छ करणे आवश्‍यक आहे. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.

– अनिल कदम, पद्मानगर.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)