नगरकर बोलू लागले…………

दूषित पाण्याने आरोग्य धोक्‍यात
सावेडी उपनगरातील वैदूवाडीत मागील दहा वर्षांपासून मलमिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पोटाचे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्याचा वाईट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल नगरसेवकांकडून घेतली नाही, त्यामुळे परिसरात रोगराई मोठ्या प्रमाणात होत आहे. गावठाण भाग असल्याचे असे दिवस काढावे लागत आहेत.
– भाऊ शिंदे, वैदूवाडीरस्त्यांची दुरुस्ती करा

शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यावरील खड्डयांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. यामुळे शहरातील विद्यार्थी तसेच दररोज प्रवास करणाऱ्यांमध्ये मनक्‍याच्या आजारांचे बळी अधिक दिसून येतात, या रस्त्यांवरील खड्ड्यांची वेळोवेळी दुरूस्ती केल्यास अशा आजारांना बऱ्याचशा प्रमाणात आळा घातला जाईल.
– संदीप गाडे, सर्जेपुरामोकळ्या जागेत क्रीडाभवन उभारावे

शहरात खेळाडू घडविण्यासाठी पूरक अशा सुविधा नाहीत. खेळाडूंना मैदाने नाहीत. प्रत्येक प्रभागात कुठेतरी मोकळी जागा असते, अशा जागांचा वापर क्रीडाभवन उभारण्यासाठी करावा, त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू हा नगरमध्येच घडेल, याबाबत लोकप्रतिनिधी व महापालिकेने सामुहीकपणे लक्ष देण्याची गरज आहे.
– रोहीत पवार, हनुमान नगर, पाईपलाईन रोडई-रिक्षा सुरू कराव्यात

शहराचा दिवसेंदिवस आवाका वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, शहराची रचना, रस्ते, पाण्याची सोय यांत बदल करण्याची आवश्‍यकता आहे. आज शहरातील बससेवा पूर्णतः बंद आहे, जर महापालिकेला शहर बससेवा पुरविणे शक्‍य होत नसेल, तर त्यांनी ई-रिक्षांचा उपक्रम हाती घ्यावा. त्यामुळे खासगी रिक्षाचालकांकडून होणरी प्रवाशांची लूट थांबेल.
– सागर पवार, सुडके मळातक्रार पेट्या बसवाव्यात

प्रत्येक प्रभागात नागरिकांना अनेक अडचणी असतात. प्रत्येकजण हा लोकप्रतिनिधींना आपली अडचण सांगू शकत नाही. काही अडचणी या सामुहीक तर काही वयक्‍तिक स्वरूपाच्या असतात, त्यामुळे प्रत्येक प्रभागात तक्रारपेट्या लावाव्यात. नुसत्या तक्रारींची पेटी भरून ती कचराकुंडीवर न टाकता, त्या तक्रारींचे निराकरणदेखील झाले पाहिजे.
– प्रिया दळवी, भोसले आखाडाशहराचा सर्वांगीण विकास व्हावा

शहरामध्ये अनेक दिवसांपासून असे ऐकून आहे की, संपूर्ण शहरामध्ये भूयारी गटार योजना राबविली जाणार, त्यामध्ये संपूर्ण शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाणार मात्र, असे केंव्हा होणार? महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा जिल्हा असूनदेखील विकासाच्या दृष्टीकोनातून सर्वात मागास जिल्हा आहे.
– शहाजी साबळे, सोनानगरपाणीगळती बंद करावी

शहरामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे, शहरातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणारी वाहिका अनेक ठिकाणी लिकेज होत आहे. अशा लिकेजची महापालिकेने तत्काळ दुरूस्ती करावी. सर्व शहरामध्ये शुद्ध पाणी पुरवठा कसा करता येईल यावर अधिक भर द्यावा.
– विनायक पालवे, निर्मलनगरमोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

शहरातील मोकाट जणावरांचा प्रश्‍न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत आहे. बऱ्याचशा चौकांमध्ये तसेच रस्त्यांमध्येच मोकाट जणावरे ठाण मांडूण बसलेले असतात, त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते, शाळकरी विद्यार्थ्यांना जनावरांपासून हाणी पोहचविण्याची दाट शक्‍यता असते. असे अपघात टळावे, यासाठी महापालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
– संदीप शिंदे, सिद्धार्थनगरशहरातील रस्त्यांमध्ये सुधारणा करा

शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाही. दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्त्यांवर खर्च होतात. मग हे रस्ते चांगले का होत नाही हे कळत नाही. टक्‍केवारीमुळे ठेकेदारांकडून रस्त्यांची कामे निकृष्ठ करण्यात येतात. अधिकारी देखील याबाबत कोणतीही कारवाई करीत नाही. उलट सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार ठेकेदार नियुक्‍त करून त्यांना कामे देतात.
प्रशांत कुलकर्णी, शिवाजीनगर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)