नगरकर  बोलू लागले…


मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे 

नगर शहर हे मध्यवर्ती असूनही मागासेले आहे. या शहरात पालीकेने रस्ते, पाणी,वाहतूक, कचरा अशा मुलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. आज तरुण पिढी आपले शहर सोडून नोकरीसाठी बाहेरच्या शहरात जात आहे. या पिढीला पुणे, मुंबईसारख्या शहराचे आकर्षण जास्त वाटते, कुठेतरी हे नगरचे अपयश आहे का? याचा विचार केला पाहिजे.
शुभदा जोशी, पटवर्धन चौक.

 कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्‍यक 

या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण अजूनही झालेले नाही. तसेच कचरा संकलनासाठी वेळेवर गाडी येत नसल्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही. तरी महापालीकेने याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनेकदा अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत.
श्रुतिका हजारे, सिव्हिल हडको. 


पथदिव्यांची समस्या कायम 

शहरातील या भागात काही ठिकाणी पथदिवे नाहीत. जे आहेत ते दिवसभर चालू असतात. पथदिवे नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. तरी पालीकेने याबाबत योग्य ते नियोजन करणे आवश्‍यक आहे. तसेच या भागात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वाचनालय सुरु करावे.
शुभांगी सुरसे, भिस्तबाग चौक. 


बंदिस्त गटारांची आवश्‍यकता 

शहरातील या भागात बंदिस्त गटारी नसल्याने, त्यात कचरा जावून त्या वारंवार तुंबतात. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक नागरिक वारंवार आजारी पडत आहेत. या डासांमुळे साथीचे रोग पसरत आहेत. तरी पालिकेने याकडे लक्ष द्यावे.
– प्रणिता केरुळकर, मुकुंदनगर. 


शहराचा सांस्कृतिक वारसा जतन करावा 

नगर शहरामध्ये रस्ता, पाणी, आरोग्य या मुलभूत सेवांची गरज आहे. या मुलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. मुलभूत सुविधाच नसतील तर मोठे उद्योग या शहरात येणार नाहीत. याकडे पालिकेने लक्ष दिल्यास शहराचा विकास होईल. शहराच्या सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पालीकेने थिएटर बांधावे. यामुळे हौशी प्रेक्षकांना कमी पैशात नाटकांचा आनंद घेता येईल.
– अमोल साळवे, सावेडी. 


शहरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य

शहरामध्ये रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काही उपाययोजना होणे गरजेचे आहे. यामध्ये शहरातील प्रत्येक चौकामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्‍यकता आहे. याचा फायदा पोलिस यंत्रणेलादेखील होईल. लहानग्यांसाठी उद्यान होणे आवश्‍यक आहे.
– प्रा. डॉ. प्रकाश जाधव, गुलमोहर रोड 


मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा 

शहरातील मोकाट जणावरांचा प्रश्‍न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर होत आहे. बऱ्याचशा चौकांमध्ये तसेच रस्त्यांमध्येच मोकाट जणावरे ठाण मांडूण बसलेले असतात, त्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते, शाळकरी विद्यार्थ्यांना जनावरांपासून हाणी पोहचविण्याची दाट शक्‍यता असते. असे अपघात टळावे, यासाठी महापालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
– प्रा. नवनाथ भोंदे, चितळे रोड 


एकमार्गी रस्ते सुरू करावेत

पुणे-मुंबईमधील रस्त्यांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून नगर शहरातील रस्त्यांची दुरूस्ती करणे अपेक्षित आहे. त्या ठिकाणी असणारी वाहतूकीचे नियम आपल्या नगर शहरातदेखील पाळणे गरजचे आहे. विविध ठिकाणी एकमार्गी रस्ते सुरू केल्यास अशा वाहतूक कोंडीवर बऱ्याचशा प्रमाणात आळा घालता येईल.
– दीपक व्यापारी


फुटलेली जलवाहिन्या दुरूस्त करा

शहरामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे, शहरातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणारी वाहिका अनेक ठिकाणी लिकेज होत आहे. अशा लिकेजची महापालिकेने तत्काळ दुरूस्ती करावी. सर्व शहरामध्ये शुद्ध पाणी पुरवठा कसा करता येईल यावर अधिक भर द्यावा.
– विकास पालवे, निर्मल नगर 


महापालिकेने वाचनालय सुरू करावे 

नगर शहरात महापालिकेमार्फत कोणतेच मोठे सार्वजनिक वाचनालय चालविले जात नाहीत. केवळ मोफत वृत्तपत्रांचा छोटेशे वाचनालय सुरू आहेत. यासाठी महापालिकेने मोठे वाचनालय सुरू करणे गरजेचे आहे. त्यामध्ये साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक या सर्व विषयांवरील पुस्तकांचा संग्रह असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढेल.
– संकेत आढाव, दक्षतानगर, पाईपलाईन रोड


कचरा उचलण्यासाठी घंटागाडी वेळेवर नाही 

सपकाळ चौक ते कलानगर चौक परिसरामध्ये पथदिव्यांचा मोठा प्रश्‍न आहे. या दरम्यान पथदिवे नाहित, आणि असलेली पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे संध्याकाळी महिलांसाठी हा रस्ता धोक्‍याचा बनून जातो, पाणी पुरवठ्यामध्ये अधून-मधून सातत्य बिघडते, त्याचबरोबर कचराकुंडीतील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे अनेकदा कचरा रस्त्यावर विखुरला जातो. तसेच नागरिकदेखील उघड्या नाल्यांमध्ये कचरा टाकून देतात त्यामुळे दुर्गंधी पसरली जाते.
– रोहीत भिंगारदिवे, भिंगारदिवे मळा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)