नगरकर बोलू लागले…शहराचा विकास खुंटला

कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्‍यक

समता नगर परिसरात कचऱ्याची समस्या असून कचऱ्याची गाडी वेळेवर येत नसल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराकुंड्याचीही दुरावस्था झाली आहे. या कचराकुंड्या नियमितपणे साफ करणे आवश्‍यक आहे.

– प्रीती आढाव, समतानगर

 


रस्त्याची दुरवस्था

पाईपलाईन रस्ता परिसरात रस्त्याची दुरावस्था झाली असून यामुळे अनेकदा अपघात होतात. पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करणे कठीण होते. पावसाळ्यात रस्त्यावर साजलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढते. यामुळे परिसरातील रस्ते दुरुस्त करणे आवश्‍यक आहे.

– डॉ. अंजली कापसे, पाईपलाईन रोड

 


बंदिस्त गटारांची समस्या

 

या परिसरातील बंदिस्त गटाराची समस्या गंभीर असून वारंवार या बंदिस्त गटार फुटत असल्याने डासांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे या परिसरात रोगराई वाढत आहे. तरी या परिसरातील बंदिस्त गटारांची समस्या पालीकेने दूर करावी.

-निकिता काळे, बोल्हेगाव

 


कचरा व्यवस्थापन आवश्‍यक

सिव्हील हडको परिसरात नियमित कर्मचारी व कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत. त्यामुळे या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य वाढते, दुर्गंधी सुटते. यामुळे रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. इतर परिसरातही महापालिका कचऱ्याचे योग्य ते नियोजन व कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावताना दिसत नाही. कचरा व्यवस्थापनासाठी चांगल्या प्रकारची यंत्रणा राबविणे खूप महत्वाचे आहे.

– हरिदास गावीत, सिव्हील हडको


तरुणांनी राजकारणात सक्रिय सहभागी व्हावे

आजच्या घडीला सर्वच जण म्हणतात, महापालिकेने विकास केला पाहीजे. मूलभूत समस्यांचे निराकरण केले पाहिजे. मात्र तरुण फक्‍त बोलतोय. तरुणांनी राजकारणात विशेष सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. फक्‍त प्रतिष्ठा मिळविण्यासाठी नव्हे तर अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून त्याचे निराकरण कसे होईल. विकासासाठी कोणत्या उपाययोजना, त्या कशा अमलात येतील यावर तरुणांनी भर दिला तरच नगर हे विकासाचे नगर म्हणून ओळखले जाईल.

– नेहाल घोडके, कौठीची तालीम, माळीवाडा.


शहराचा विकास खुंटला

विविध गोष्टींसाठी महापालिका जनतेकडून विविध प्रकारचे कर आकारते. काही जनता पूर्ण कर भरते तर काही जनता भरत नाही. प्रत्येक सामान्य जनतेला प्रश्‍न पडतो की, एवढ्या मोठ्या प्रमाणात कर भरुनही विकासाची कामे का होत नाही? याला जबाबदार कोण? महापालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे विकास खुंटला आहे.

– राहुल गुंजाळ, नेप्ती नाका.


अतिक्रमणाविरोधात कडक नियम करावे

शहरात विविध भागांत खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. मोठमोठ्या नेत्यांचे अतिक्रमण काढण्यातही महापालिका अपयशी ठरत आहे. त्यामुळे मनपाच्या जागेत विविध लोकांनी आपले तळ ठोकलेले दिसत आहेत. हे अतिक्रमण काढले जात नसल्याने रस्त्यांची रुंदी हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. अतिक्रमण विरोधात कडक नियम करुन अतिक्रमण करणाऱ्यांवर महापालिकेने कडक कारवाई केलीच पाहिजे.

– रोहन रोहकले, बुरुडगाव रोड


महिला सुरक्षा व सबलीकरणासाठी उपाय करावेत

नगर शहरामध्ये महिला सुरक्षा व महिला सबलीकरण करण्यासाठी महापालिकेने संरक्षण प्रशिक्षण तासिका सुरु कराव्यात. आज समाजात कोठे न कोठेतरी महिला अत्याचाराला बळी पडत आहे. महिला जर स्वत:चे संरक्षण करु शकली तर ती अशा अत्याचाराला बळी पडणार नाही. महापालिकेने महिलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे गिरवलेच पाहिले.

– प्रतीक्षा दुगम, डीएसपी चौक


महापालिकेचे रुग्णालय अद्ययावत असावे

आजघडीला आरोग्य सेवा खूप महागली आहे. गरिबाच्या आवाक्‍याबाहेर आरोग्याची संकल्पना जाऊन बसली आहे. महापालिकेचे रुग्णालय आहे. मात्र तेथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेच्या नावावर सावळागोंधळ सुरु आहे. . खासगी रुग्णालयातील खर्च गरीब जनतेला परवडत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिकेने आपले रुग्णालय अद्ययावत केले पाहिजे.

– श्‍वेता बारस्कर, कोर्ट गल्ली


अतिक्रमणाची समस्या

सुडके मळा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण ही प्रमुख मोठी समस्या असून यामुळे रहदारीस अडचण निर्माण होते. या अतिक्रमणांमुळे वाहनचालकास कसरत करावी लागते. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. कोणतीही रिक्षा या परिसरातून जाताना जादा दर आकारणी करते. शहरांतर्गत बससेवा सुरु होणे आवश्‍यक आहे.

– चित्रा गटणे, सुडकेमळा


पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे

ताठे मळा परिसरात इतर सुविधा असल्या तरीही पिण्याचे पाण्याचे योग्य असे व्यवस्थापन नसल्याने अनियमीत येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची धांदल उडते. अनेकदा कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागते. यामुळे पालिकेने पिण्याच्या संदर्भात योग्य नियोजन करुन नागरिकांची समस्या दूर करावी.

– रोहिणी नेवसे, ताठे मळा


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)