नगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा

डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा

महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक स्वच्छतागृहे, भाजीमंडई आणि मटण मार्केट यासाठी स्वच्छ व सर्व सोयींयुक्त अशी अद्यावत मार्केटस्‌ या सुविधांची टंचाई आहे. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये मंजूर डेव्हलपमेंट प्लॅन राबविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– अक्षय घोडके, सावेडीगाव


बंद पथदिव्यांची दुरुस्ती करावी

प्रभागात रस्ते चांगले आहेत. परिसरात स्वच्छता आहे. बंद पथदिव्यांची दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे. पिण्याचे पाणी नियमीत यावे. कचरा गाडी दररोज आल्यास कचऱ्याची समस्या भेडसवणार नाही.
– विकास माकण, पारिजात चौक.


वाहतूक कोंडीवर उपाययोजना आवश्‍यक

एकविरा चौकात वारंवार वाहतूक कोंडी होते, तसेच अनेकदा अपघात होतात. या ठिकाणी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. विविध सण उत्सवाच्या काळात रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकांनामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होतो.
-किरण देशमाने, एकविरा चौक.


कचरा गाडी नियमीत यावी

या परिसरात कचरा गाडी दररोज येत नसल्याने, रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो. या प्रभागात रस्त्याच्या कडेला कचरा कुंड्या बसवणे आवश्‍यक आहे. कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी येते. या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी.
– अनिल साळुंके, जूना माळवी, पिंपळगाव रोड.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)