नगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’

सातत्याने कामे करावीत

आमच्या लोकप्रतिनिधीने रस्ता कॉंक्रीटीकरण, गटार अशा मुलभूत सुविधा केलेल्या आहेत. तसेच पुढील काळात भावी नगरसेवकाकडून आमच्या प्रभागात समाज मंदिर, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, स्पर्धा परीक्षा केंद्र करावे. आता प्रभाग मोठा असल्याने आणि अनेक भाग या प्रभागात समाविष्ट झाल्याने आता लोकप्रतिनिधींनी असेच सातत्याने काम करुन प्रभागाला सर्वात आदर्श बनवावे अशी अपेक्षा आहे.
– सुनील भोसले, सर्जेपुरा


नगर खड्डेमुक्‍त करावे

आमच्या प्रभागामध्ये बऱ्यापैकी विकासकामे होतात. पाण्याच्या लाईन व्यवस्थित होऊन पाणी पूर्ण दाबाने यावे यासाठी काम करायला हवे. वॉर्डमध्ये चोरांपासून संरक्षण होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. लोकप्रतिनिधींनी मिळून नगरविकासाचा ध्यास धरला पाहिजे. आणि नगर खड्डेमुक्‍त केले पहिजे. प्रभागामध्ये सर्व ठिकाणी कचरा जमा करणाऱ्या पालिकेच्या गाड्या वेळच्या वेळी यायला हव्यात तसेच नागरिकांनीही पालिकेला सहकार्य केले पाहिजे. – राजू कडवा, बालिकाश्रम रोड


दूषित पाण्याचा प्रश्‍न गंभीर

सावेडी उपनगरातील वैदूवाडीत मागील दहा वर्षांपासून मलमिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. यामुळे पोटाचे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्याचा वाईट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल नगरसेवकांकडून घेतली नाही, त्यामुळे परिसरात रोगराई मोठ्या प्रमाणात होत आहे. गावठाण भाग असल्याचे असे दिवस काढावे लागत आहेत.
– रामभाऊ तात्या शिंदे, वैदुवाडी


अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली

वाणीनगर ते तागडवाडी रस्ता हा अनेक वर्षांपासून रस्ता नादुरूस्त आहे. मध्यंतरीच्या काळात रस्ता दुरूस्त करण्यात आला, मात्र तो काही कालावधीतरच खड्डेयुक्‍त झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मनका, तसेच सांध्याचे आजारांना सामोरे जावे लागत आहे, तसेच या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने येण्याजाण्यासाठी कमी रस्ता राहिला आहे. परिसरामध्ये एक सांडपाण्याचा नाला जात आहे, तो उघडाच असल्याने दुर्गंधीबरोबरच डासांचे प्रमाण वाढत आहे. परिसरात साथीचे आजार पसरत आहेत.
– शैलेश थोरात, तागडवाडी


पथदिव्यांची मोठी कमतरता

सिव्हील हडको परिसरातील रस्त्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. त्याचबरोबर या भागात अनेकदा अशुद्ध पाणी येते, त्यामुळे पोटाचे आजारांचे प्रमाण वाढले आहे. तसेच या प्रभागामध्ये पथदिव्यांचा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे रात्री उपरात्री परिसरात काळोख पसरलेला असतो. तसेच मोकाट कुत्र्यांचा उपद्रव आजही जैसे थेच आहे. काही ठिकाणी कचराकुंड्या गरजेच्या आहेत. चेंबरलाईन जून्या झाल्यामुळे सदोष आढळून येतात, अनेकदा त्यातून सांडपाणी बाहेर येऊन परिसरात दुर्गंधी पसरते.
– संकेत शहा, सिव्हिल हडको


कचरा उचलण्यासाठी घंटागाडी वेळेवर नाही

सपकाळ चौक ते कलानगर चौक परिसरामध्ये पथदिव्यांचा मोठा प्रश्‍न आहे. या दरम्यान पथदिवे नाहित, आणि असलेली पथदिवे बंद अवस्थेत आहेत.
त्यामुळे संध्याकाळी महिलांसाठी हा रस्ता धोक्‍याचा बनून जातो, पाणी पुरवठ्यामध्ये अधून-मधून सातत्य बिघडते, त्याचबरोबर कचराकुंडीतील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे अनेकदा कचरा रस्त्यावर विखुरला जातो. तसेच नागरिकदेखील उघड्या नाल्यांमध्ये कचरा टाकून देतात त्यामुळे सांडपाणी अनेकदा रस्त्यावरून वाहते, दुर्गंधी पसरली जाते.
– राहुल उजागरे, भिंगारदिवे मळा


पिण्याचे पाण्याचे व्यवस्थापन आवश्‍यक

या प्रभागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर असून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्‍यक आहे. पाण्याचा कालावधी कमी असल्याने अनेकांची धावपळ उडते, तर अनेकांना अनेक दिवस पाणी मिळत नाही. येथील पथदिवे बंद आहेत. शहरांतर्गत बससेवा सुरु होणे गरजेजे आहे. पालीकेच्या बस नसल्याने खासगी वाहनांतून प्रवास करताना अधिक खर्च येतो.
– अनिल गांधी, आकाशवाणी परिसर.


परिसरात स्वच्छतेची आवश्‍यकता

या प्रभागात पाणी नियमीत येणे आवश्‍यक आहे. परिसरात स्वच्छतेची गरज आहे. कचरागाडी वेळेवर येत नसल्याने, परंतू कचराकुंडयाचे व्यवस्थापन योग्य पध्दतीने न केल्याने परिसरात कचरा साचला जातो. रस्त्याच्या बाजूला साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी येते.
-विजय साळवे, निर्मलनगर, सावेडी.


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)