नगरकर बोलू लागले…विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वात मागास

भिस्तबागकर भरताहेत दुप्पट कर

पोलीस कॉलनी (सावेडी) भिस्तबाग परिसरात सर्व नागरिकांना दुप्पट कर भरावा लागतो. महापालिकेबरोबर तलाठी कार्यालय सावेडी यांच्याकडेही कर भरावा लागतो, सिटी सर्व्हे हा केवळ सिव्हील हडको परिसरापर्यंतच झाल्याने भिस्तबाग परिसरातील सर्वच नागरिकांना दोन्हीही ठिकाणी कर भरावा लागतो, तलाठ्याकडे कर भरणा न केल्यास सात-बारा उतारा मिळत नाही, यावर महापालिकेने काही उपाययोजना करावी.
– धनंजय साळुंके, पोलीस कॉलनी सावेडी


-Ads-

मोकळ्या जागेत क्रीडाभवन उभारावे

शहरात खेळाडू घडविण्यासाठी पूरक अशा सुविधा नाहित. खेळाडूंना मैदाने नाहीत. प्रत्येक प्रभागात कुठेतरी मोकळी जागा असते, अशा जागांचा वापर क्रीडाभवन उभारण्यासाठी करावा, त्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू हा नगरमध्येच घडेल, याबाबत लोकप्रतिनिधी व महापालिकेने सामुहिकपणे लक्ष देण्याची गरज आहे.
– रोहिणी पवार, हनुमान नगर, पाईपलाईन रोड


आजतागायत पाण्याचा फायदा नाही

पाईपलाईन रस्ता परिसरात यशोदानगर समोरील परिसरात पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आली. अतिशय वेगाने पाईपलाईनही पसरवली, मात्र काहीच उपयोग झाला नाही. 4 वर्षे होऊनही आजतागायत कोणालाही पाण्याचा फायदा झाला नाही. महापालिकेमार्फत केवळ प्रकल्प उभारणी केली जाते, मात्र त्याचा फायदा कोणत्याही भागाला होत नसल्याचे दिसून येत आहे.
– प्रा. भास्कर धानके, ओमनगर, सावेडी


तक्रारींचे निराकरण व्हावे

प्रत्येक प्रभागात नागरिकांना अनेक अडचणी असतात. प्रत्येकजण हा लोकप्रतिनिधींना आपली अडचण सांगू शकत नाही. काही अडचणी या सामुहीक तर काही वयक्‍तिक स्वरूपाच्या असतात, त्यामुळे प्रत्येक प्रभागात तक्रारपेटी लावणे अत्यंत आवश्‍यक आहे. नुसत्या तक्रारींची पेटी भरून ती कचराकुंडीवर न टाकता, त्या तक्रारींचे निराकरणदेखील झाले पाहिजे.
– प्रियांका दळवी, भोसले आखाडा


विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वात मागास

शहरामध्ये अनेक दिवसांपासून असे ऐकून आहे की, संपूर्ण शहरामध्ये भूयारी गटार योजना राबविली जाणार, त्यामध्ये संपूर्ण शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावली जाणार मात्र, असे केंव्हा होणार? महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा जिल्हा असूनदेखील विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वात मागास जिल्हा आहे.
– शिवाजीराव साबळे, सोनानगर


प्राणिसंग्रहालय उभारणे गरजेचे

शहरात काय पहावं हाच मोठा प्रश्‍न पडतो. घरी पाहुणे वगैरे आले तर, त्यांना काय दाखवावं असा प्रश्‍न कायमच पडत असतो. त्यामुळे महापालिका क्षेत्रात उद्यानांचा विकास करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्याचबरोबर एखादे प्राणी संग्रहालय उभारणे गरजेचे आहे.
– राजश्री सुर्वे, केडगाव


अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक समस्या

शहरातील डावरे गल्ली या परिसरात रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय गाडी पार्किंगची व्यवस्थाही नाही. तसेच या भागात उद्याने नाहीत, त्यामुळे लहान मुलांनी खेळायचे कुठे हा प्रश्‍न निर्माण होतो.
– संदिप महाजन, डावरे गल्ली.


बंदिस्त गटारांची दुरवस्था

या परिसरात काही ठिकाणी रस्ते नाहीत, तर काही ठिकाणी रस्ते अरुंद व कच्चे आहेत. तसेच या प्रभागात पथदिवे नाहीत.या भागात कचराकुंड्या नसल्याने कचरा रस्त्यावर टाकला जातो. कचरा संकलनाची गाडी येत नाही. तसेच बंदिस्त गटाराची दुरावस्था झाली आहे.
– राजेंद्र चव्हाण, मारुती चौक

 


पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन आवश्‍यक

या भागात बंदिस्त गटारांची सोय नाही. तसेच रस्त्याचे काम अर्धवट आहे. पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन आवश्‍यक आहे.
– महेश वारे, समतानगर

 


परिसरात उद्याने असावीत

या परिसरात बससेवा नाही, यामुळे येण्याजाण्याची गैरसोय होते. याशिवाय या भागात उद्यानाची संख्या कमी आहे. या भागात एकही वाचनालय नसल्यामुळे विद्यार्थ्यांची व जेष्ठ नागरिकांची गैरसोय होते.
– परमेश्‍वर वाडेकर, भुषणनगर

 


वाचनालय व व्यायामशाळेची आवश्‍यकता

या परिसरात बंदिस्त गटाराची दुरावस्था असल्याने परिसरात अस्वच्छता आहे. पोलिसांची गस्त नसल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. परिसरात वाचनालय व व्यायाम शाळेची आवश्‍यकता आहे.
– हेमलता सोनवणे, बोरुडेमळा.


रस्त्यांची दुरावस्था

या परिसरात जेष्ठ नागरिकांनी प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी रस्त्यालगत बाके नाहीत. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्याने नाहीत. रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे.
– तनुजा कुलकर्णी, गणेश कॉलनी

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)